त्या पहिल्या रिमझिम ...

सोमवार, मे २३, २०११ Edit This 0 Comments »


त्या पहिल्या रिमझिम अशा धुंद पावसात ,
मला तुझ्या मिठीत चिंब चिंब भिजायचंय ,
आणि भिजता भिजता तुझ्या नकळत मला ,
तुझ्या ओठांवरचा थेंब माझ्या ओठांनी टीपायचंय . . .

शक्य आहे का ...

सोमवार, मे १६, २०११ Edit This 0 Comments »

शक्य आहे का तुला कायमचे विसरणे ,
शक्य आहे का तुझ्या आठवणींतून सावरणे , 
तू तर एक अनमोल भेट आहे माझ्या प्रेमाची , 
शक्य आहे का त्या भेटीची किंमत चुकवणे . . .
                                                        . . . . . . . . . मिलिंद आग्रे 

सुंदर ती संध्याकाळ ...

सोमवार, मे १६, २०११ Edit This 0 Comments »

नुकताच कुठे सूर्य अस्ताला गेला असेल ,
आकाशी काळे ढग जमा झालेले असेल ,
मस्त असा थंड गार वारा वाहत असेल ,
अशा या रम्य संध्याकाळी ,
हातात चहा आणि आठवणीत फक्त तीच असेल 
आता तुम्हीच थोडा विचार करा ,
किती सुंदर ती संध्याकाळ असेल . . .
. .  . . . . ...मिलिंद आग्रे

उन्हाळ्यातच पावसाची सर ..

शुक्रवार, मे ०६, २०११ Edit This 0 Comments »
 
का जाणो आत्ताच नकळत तुझी आठवण आली
जशी उन्हाळ्यातच अवकाळी पावसाची सर आली
मी अलगद स्पर्श केला त्या सरींच्या टपोर्या थेंबांना
तर त्या प्रत्येक थेंबात मला तुझी छबी नजर आली ...

प्रेम ...

शुक्रवार, मे ०६, २०११ Edit This 0 Comments »
 
खूप सहजतेने कोणावर हे मन जडत ,
पण ते तिला सांगण खूप जड जात ,
घेवून जाते प्रेम अशा एका वाटेवर ,
जेथून माग फिरन खूपच अवघड असत  . . .