जाता जाता ...

गुरुवार, मे २२, २०१४ Edit This 0 Comments »


जाता जाता तिने इशारा केला ,
पुढच्या भेटीचा तिने वायदा दिला ..
कशी असणार ती भेट या विचारात ,
डोळ्याला डोळाच नाही लागला ..

मिलिंद आग्रे . . . 
https://www.facebook.com/milind.agre.58

प्रत्येक भेट ....

गुरुवार, मे २२, २०१४ Edit This 0 Comments »

तुझ्या सोबतची प्रत्येक भेट सरताना ,
हातातला हात सोडवतच नाही ...  
अशी नजर रोखून पाहू नकोस ,
परतीला मग पाय वळतच नाही ...

मिलिंद आग्रे . . .
https://www.facebook.com/milind.agre.58

मैत्रीची नाजुक कळी ...

शनिवार, मे १७, २०१४ Edit This 0 Comments »


मैत्रीची नाजुक कळी,
तेव्हा कुठे हर्षाने फुलते..
जेव्हा एकमेकांचे हितगुज,
हक्काने सांगण्यात येते..

मिलिंद आग्रे . . . 
https://www.facebook.com/milind.agre.58

नयनांची ही भाषा ... :)

शनिवार, मे १७, २०१४ Edit This 0 Comments »


नयनांची ही भाषा घे तु समजुनी,
भाव त्यातले ओळखुन घे न जरा..
छेड काढी खट्याळ वारा माझी,
राजसा तुच त्याला समजव न जरा....

मिलिंद आग्रे . . .
https://www.facebook.com/milind.agre.58

रुसलास का ... :)

शनिवार, मे १७, २०१४ Edit This 0 Comments »


रुसलास का रे असा,
गाल आता फुगवु नको ..
नाकावरच्या शेंड्याला,
लाल होऊ देऊ नको .. 

मिलिंद आग्रे . . . 
https://www.facebook.com/milind.agre.58

पदराआड तोंड लपवुन ..

शनिवार, मे १७, २०१४ Edit This 0 Comments »


पदराआड तोंड लपवुन,
नजर अशी काय चोरते ..
काळजात घाव घालतेस,
जेव्हा ईश्य अशी लाजते ..

मिलिंद आग्रे . . . 
https://www.facebook.com/milind.agre.58

तुझ्या रुपाच्या ..

शनिवार, मे १७, २०१४ Edit This 0 Comments »

तुझ्या रुपाच्या लखलख चांदण्याचा,
सडा पडलाय ग सखे अंगणात ..
चंद्र नभीचा ताटकळत बसुनी,
चांगलाच रमलाय तुला पाहण्यात ..

मिलिंद आग्रे . . . 
https://www.facebook.com/milind.agre.58

तर्हा तुझी रुसण्याची ..

शनिवार, मे १७, २०१४ Edit This 0 Comments »


तर्हा तुझी ती रुसण्याची,
लईचं भारी वाटते मला..
का कुणास ठावुक मगं,
मुद्दाम छेडावेसे वाटते तुला... 

मिलिंद आग्रे . . . 
https://www.facebook.com/milind.agre.58

कवी मन ..

शनिवार, मे १७, २०१४ Edit This 0 Comments »


कवी मन जागे तर होतेचं,
फक्त त्यावर धुळ बसलेली ..
तुझी हलकी फुंकर मिळताचं,
ती कुठच्या कुठे उडुन गेली ..

मिलिंद आग्रे . . .
https://www.facebook.com/milind.agre.58

मस्त गार वारा ..

शनिवार, मे १७, २०१४ Edit This 0 Comments »

मस्त गार वारा असा बेभान सुटला,
त्या वारयाने केली राव भलतीच लगट..  
पदर उडवुन तिचा माझ्या चेहरयावर,
दाखवुन दिली ना त्याने स्वत:ची वट.. 

मिलिंद आग्रे . . . 
https://www.facebook.com/milind.agre.58

तुझ्या डोळ्यातले ..

शनिवार, मे १७, २०१४ Edit This 0 Comments »

तुझ्या डोळ्यातले काजळ,
कसे लखलखतेय बघ..
सुंदर नथ ती नाकातली,
कशी झुलतेय ती बघ..

मिलिंद आग्रे . . . 
https://www.facebook.com/milind.agre.58

रातच्याला एक सपन पडल ..

शनिवार, मे १७, २०१४ Edit This 0 Comments »


रातच्याला एक सपन पडल ,
त्यात मला तूच दिसली ..
नजरेचे शर मारीत तू ,
गहिरी चाल तू चालली ..

कळी तुझ्या ओठांची ,
मस्त पाकळ्यासारखी खुलली ..
मोहरून गेलो पुरता मी ,
चांगलीच भुरळ पडली ..

हात घेता हाती तुझा मग ,
अंगावर काटे उभे राहिले ..
खांद्यावर डोके ठेवता माझ्या ,
मला एक वेगळेच सुख वाटले ...  

स्वप्नच होते ते माझे ,
एक स्वप्नच शेवटी ठरले .. 
पण काही असो स्वप्नात मात्र ,
मनाला मी चांगलेच रमावले ..

मिलिंद आग्रे . . . 
https://www.facebook.com/milind.agre.58

स्वप्न पहाटेचे ..

शनिवार, मे १७, २०१४ Edit This 0 Comments »

स्वप्न पाही पहाटेचे रंगीन ,
त्यात तुज गुलाबी चेहरा दिसतो ..
आवरू कसे सखे या मनाला ..
जिथे तिथे फक्त तुझा भास होतो ..

मिलिंद आग्रे . . . 
https://www.facebook.com/milind.agre.58

डोळ्यातल्या मुक भावना ..

शनिवार, मे १७, २०१४ Edit This 0 Comments »


डोळ्यातल्या मुक भावना,
तुला काही समजतायत का ?
किती प्रेम आहे तुझ्यावर,
तुला काही उमजतेय का ?


मिलिंद आग्रे . . . 
https://www.facebook.com/milind.agre.58

लाजु नकोस ...

शनिवार, मे १७, २०१४ Edit This 0 Comments »

लाजु नकोस एवढे राणी,
डुलाया लागतो हा मनमोर..
उगा बोबाटा होईल गावामंधी,
नक्की कोन तो चितचोर ..

मिलिंद आग्रे . . . 
https://www.facebook.com/milind.agre.58

तुझ्या नजरेत...

शनिवार, मे १७, २०१४ Edit This 0 Comments »


तुझ्या नजरेत पाहता पाहता,
मी कुठेतरी हरवुनच जातो..
वेळ मात्र पटापट सरते म्हणुन,
तिच्यावर डुग धरुन बसतो ..

मिलिंद आग्रे . . . 
https://www.facebook.com/milind.agre.58

गुपित माझ्या मनातले ...

शनिवार, मे १७, २०१४ Edit This 0 Comments »

गुपित माझ्या मनातले ,
तुच आता ओळखुन घे...  

नयनांची अबोल भाषा ,
तुच आता समजुन घे.. 

थकले रे मी राजसा आता,
तुला ईशारे देता देता..  

माझी मुकी प्रित ही वेड्या
कळेल का तुला न सांगता  ...  :(

मिलिंद आग्रे . . . 
https://www.facebook.com/milind.agre.58

तुझ्या पापण्यांच्या ...

शुक्रवार, मे ०२, २०१४ Edit This 0 Comments »




तुझ्या त्या पापण्यांच्या खाली

घटकाभर विसावा घेईन म्हणतो ..

ओल्या टपोर्या थेंबांना त्या ,

अलगद टिपून घेईन म्हणतो ..


मिलिंद आग्रे . . . 

 https://www.facebook.com/milind.agre.58

हृदयी वसंत ...

शुक्रवार, मे ०२, २०१४ Edit This 0 Comments »




हृदयी वसंत फुलला ग राणी ,

तुझ्या प्रीतीची चाहूल लागली ..

लई ग्वाड तुझ वळून पाहणे

नजरेनेच जीवाची घालमेल झाली ..


मिलिंद. . .
https://www.facebook.com/milind.agre.58

चांदण्या रातीला ...

शुक्रवार, मे ०२, २०१४ Edit This 0 Comments »



चांदण्या रातीला त्या,

चंद्राची अतूट साथ ..

किती वाट पाहू सजना,

थकले घालूनी रे साद ..

मिलिंद ... 
https://www.facebook.com/milind.agre.58

अवसेची ती रात..

शुक्रवार, मे ०२, २०१४ Edit This 0 Comments »

अवसेची ती भयाण रात,

रातकिड्यांची किर्रर्र साथ ..

माझे मन मात्र तुला शोधी ,

काजव्याच्या मंद प्रकाशात ..


मिलिंद आग्रे . . .
https://www.facebook.com/milind.agre.58