अन तो सुद्धा दूर . .

शुक्रवार, सप्टेंबर ३०, २०११ Edit This 0 Comments »


काल रातीचा चंद्र अगदी
तुझ्यासारखा भासत होता ,
अगदी म्हणजे अगदी तुझ्यासारखा . . .

तीच ती सुंदरता ,

तेच ते तेज ,

तीच ती अकड ,

तोच तो नूर ,

अन तो सुद्धा माझ्यापासून तेवढाच दूर . . .

मिलिंद आग्रे . . .
http://www.facebook.com/milindagre

* * नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा * *

बुधवार, सप्टेंबर २८, २०११ Edit This 0 Comments »


 * * *नव रात्रीचे हे* * *
 * * *नऊ दिवस* * *
* तुमच्या जीवनात *
* * *नवरंग भरो* * *

* * जय माता दी * *
* * नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा  * *
मिलिंद आग्रे
http://www.facebook.com/milindagre

असे हे सरकार आपुले . . .

रविवार, सप्टेंबर २५, २०११ Edit This 0 Comments »


आज जिथे तिथे होतायत बॉम्बस्फोट
यांना आवर तरी कोण घालणार
मात्र वर तोंड करून नक्की म्हणणार
बॉम्बस्फोट तर होताच राहणार
. . . .असे हे सरकार आपुले

आजही अंधारलेली गावे आहेत इथे
ज्यांनी सूर्याशिवाय उजेड पहिला नाही
पण या पांढरपेशीच्या पार्ट्या सभांना
रोषणाई कधी चुकली नाही
. . . .असे हे सरकार आपुले

करोडोंचा खर्च होतो त्या अतिरेक्यावर
का तर त्याला सुरक्षित ठेवावे
इथे एक रोज निष्पापाचा बळी जातोय
त्यांच्याकडे कोणी बरे ते पाहावे
. . . .असे हे सरकार आपुले

आजही इथला गरीब अर्धपोटी झोपतोय
वंचीत आहे तो पोटभर जेवणासाठी अजून
पण त्या पापाच्या धनी कसाबला मात्र
पोटभर बिर्याणी खायला आवर्जून
. . . . असे हे सरकार आपुले

या देशात बाहेरून येणाऱ्या अतिरेक्यांना
बिनधास्त असा प्रवेश मिळतो
मात्र याच मातीतल्या माणसांना
तो आधाराची ओळख नक्की मागतो
. . . .असे हे सरकार आपुले

 
मिलिंद आग्रे . . . 
http://www.facebook.com/milindagre

स्वर्गाची अनुभूती . . .

शनिवार, सप्टेंबर २४, २०११ Edit This 0 Comments »


ह्या गार गार थंडीमध्ये
तुझी ती उबदार मिठी हवी
मरण्याआधीच सोने मला 
स्वर्गाची अनुभूती ती यावी ..

मिलिंद आग्रे . . .
http://www.facebook.com/milindagre

सकाळची वेळ होती ..

बुधवार, सप्टेंबर २१, २०११ Edit This 0 Comments »

सकाळची वेळ होती
ऑफिस ला निघालो होतो
बस मध्ये बसून
   बाहेर डोकावत होतो ...

अलगद गारवा
सुटला होता हवेत
मस्त सुंदर वेळ ती
  जणू माझ्या कवेत ...

तितक्यात एका स्टोप वर
एक मुलगी चढली
काय सांगू तुम्हाला
  तिची ती नजर पहिली ...

साधा पेहराव तिचा
गळ्यात लाल ओढणी
सर्वांची नजर मग
  तिच्यावरच खिळली ...

आली ती गर्दीत
स्वताला सावरत
डोळ्यांवरची ती बट
  अलवार बाजूला सारत ...

ती गहिरी नजर शेवटी
माझ्यावर पडली
अन चक्क ती मुलगी
   माझ्या जवळ आली ...

जवळ येऊन माझ्या
काय म्हणावे तिने मला
म्हणाली लेडीज सीत आहे
  उठ लवकर, बसू दे मला ...

काय राव काय सांगू  कसला
हिरमोड झाला तिथे माझा
पण मी ऐकून घेतोय काय
  मी हि अस्सल पुजारी प्रेमाचा ..

म्हणालो तिला, बस ग तू
या जागेचा काही फायदा नाही
माझ्याशी मैत्री करून तर बघ
  मनात भरल्याशिवाय राहणार नाही

हे चार शब्द ऐकताच
ती अशी काही हसली
गुलाबांच्या त्या पाकळ्यांवर
काय मस्त लाली खुलली...
 
काय मस्त लाली खुलली

मिलिंद आग्रे . . . 
http://www.facebook.com/milindagre

कोणाची आस ?

मंगळवार, सप्टेंबर २०, २०११ Edit This 0 Comments »

 
गुंतुनी विचारांत तू
 
अशी का बसली आहे  ?
 
काय चालू आहे मनी
 
कोणाची ती आस आहे ?


मिलिंद आग्रे . . . 
http://www.facebook.com/milindagre

माझे अस्तित्व आहेस ग तू . . ..

शनिवार, सप्टेंबर १७, २०११ Edit This 0 Comments »



ती :-
तू आता पहिल्यासारखा का राहिला नाही ?

तो :-
कसा असणार ? आता तुझी साथ जी सोबतीला नाही ...

ती :-
आता परत कोणाच्या नजरेत गुंतशील का ?

तो :-
आता गुंतायला तशी पाणीदार नजर सापडणार नाही... 

ती :-
सोन्या इतके कशाला रे प्रेम केलेस रे माझ्यावर ?

तो :-
जीव तू माझा , अन स्वताचा जीव कोणाला प्रिय नाही ...

ती :-
सख्या तूच सांग मी काय बेवफा आहे काय ?

तो :-
सोने बेवफा आपले नशीब आहे ग तू बिलकुल नाही ..

ती :-
मग असे कर न , विसरून जा ना मला तू कायमचा ... 

तो :-
(जरा हसतच म्हणाला )
माझे अस्तित्व आहेस ग तू , तुला  विसरायला तू एक स्वप्न नाही ...



मिलिंद आग्रे . . . 
 http://www.facebook.com/milindagre

निदान ती तरी . . .

शुक्रवार, सप्टेंबर १६, २०११ Edit This 0 Comments »


एकांतात असलो कि ,
तिची आठवण येऊन छळते, 
बरय ना यार, निदान,
ती तरी येऊन सोबत देते..

मिलिंद आग्रे . . .
http://www.facebook.com/milindagre

प्रेम कहाणी . . .

शनिवार, सप्टेंबर १०, २०११ Edit This 0 Comments »


तुझी न माझी प्रेम कहाणी
अशी अधुरी कशी ग ?
दोन शब्दांमध्ये त्यांची वर्णी
सखे लावू तरी कशी ग ?

मिलिंद आग्रे . . .
 
http://www.facebook.com/milindagre

गजानन ...

शनिवार, सप्टेंबर ०३, २०११ Edit This 0 Comments »



ग-गजाचे मुख आहे ज्याच्या शिरावर ,
जा-जानुनी दुख भक्तांचे करी निर्वाण ,
न-नष्ट होई पाप ज्याच्या एका इशारयावर ,
न-नतमस्तक त्यांच्या चरणी या पामराची मान . . .

यंदाचा गणेशोत्सव सर्वांना सुख समृद्धी देओ ..
हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना 
मिलिंद आग्रे . . . 
http://www.facebook.com/milindagre