आठवतंय का तुला ?

सोमवार, जुलै २५, २०११ Edit This 0 Comments »


आठवतंय का तुला ?

त्या पहिल्याच भेटीच्या रिमझिम पावसात 

तुझे हात माझ्या हातात गुरफटले होते ...

आपल्या त्या निर्णयावर त्या पावसानेही 

जणू फुलांचे टपोरे थेंब सोडले होते ...


 मिलिंद (नंदू) आग्रे . . . 

https://www.facebook.com/milind.agre.58 

Mb. No :- 8108821950

शहारा ...

बुधवार, जुलै २०, २०११ Edit This 0 Comments »


शहारा आणतो ग तुझा स्पर्श ,
शिरतेस तू जेव्हा मिठीत माझ्या ,
आवर घाल ग तुझ्या स्पर्शाला ,
कळतंय काय आहे मनात तुझ्या . . .
मिलिंद आग्रे . . . 

नखरेल हि रात्र...

गुरुवार, जुलै १४, २०११ Edit This 0 Comments »




नखरेल हि रात्र माझी सोने ,
तुझ्याच मिठीत विरून जावी,
पहाटे पुन्हा तुझा चेहरा पाहून,
माझी अलगद झोपमोड व्हावी,
मिलिंद आग्रे ...

सांज वेडी ...

गुरुवार, जुलै १४, २०११ Edit This 0 Comments »

सांज वेडी खुळी सरणार रे ,
मावळत जाणार हा प्रकाश ,
खुलणार नभी त्या चंद्रमा ,
फक्त काही क्षणांचा अवकाश ..
मिलिंद आग्रे ...

असा दिवस कधी येईल ...

बुधवार, जुलै १३, २०११ Edit This 0 Comments »

घराच्या बाल्कनीतून उभी राहून 
सोने तू चंद्राकडे पाहत राहील ...

मग दब्या पावलाने मी मागून येऊन
तुझ्या कमरेला अलगद विळखा घालीन ...

तू हि हळूच मग मागे वळून
माझ्या नजरेला नजरकैद देशील ...

त्या बोलक्या अशा धुंद नजरेने
तू मला अलगद मिठीत घेशील ..

प्रसंगावधान राखून मग चंद्रही
लाजेने त्या ढगाआड लपून जाईल ...

सांग न सोने असा दिवस कधी येईल ...
कधी येईल.. कधी येईल ..

सोने साथ देशील का कायमचा.....

बुधवार, जुलै ०६, २०११ Edit This 0 Comments »


आकाशी सप्तरंगी ईंद्रधनुष्य,
तुझ्या प्रत्येक भेटित नवा हर्ष,
तुझा तो घायाळ करणारा कटाक्ष,
तुझा तो चोरुन मिळणारा स्पर्श...

तुझ्या गालावरची ती खळी,
जणु ते मन माझे जाळी,
नाक तुझे ते चाफेकळी,
न उमललेली तु नाजुक कळी...

गुलाबाच्या पाकळ्यासारखे ओठ लाल,
हरणीसारखी नखरेल चाल,
रुपाला तुझ्या सोने तुच आवर घाल,
मादक नजर तुझी करी जिवाला घायाल...

तुझा तो तोरा, डौलदार थाट,
सुडौल बांधा, रेशमी असा हात,
शरिराचा जणु वळणदार घाट,
न उलगडणारि तु एक पायवाट...

तुझे ते सुंदर पाणीदार डोळे,
पावसात चिंब शरिर भिजलेले,
उगाच पाय घसरेल कि काय पण,
मी स्वतःच स्वतःला सावरले...

तुझ्या पायातले ते पैंजण,
कानात झुमके, हातात कांकण,
जणु मथुरेच्या बाजाराला,
निघालेली सुंदर तु गवळण...

सोने फक्त तूच मला म्हणाली,
म्हणुन मी ही कविता रचली,
हा कवितेचा छोटा प्रयत्न पाहुन,
खुलेल का गं तुझ्या ओठांची लाली...

माझा हा पहिलाच प्रयत्न कवितेचा,
मान राखुन आपल्या या प्रेमाचा,
खरचं खुप प्रेम केलय तुझ्यावर मी,
सांग सोने साथ देशील का कायमचा...

सांग सोने साथ देशील का कायमचा...

सांग सोने साथ देशील का कायमचा...

मिलिंद आग्रे