खिडकीच्या काचेवर ..

मंगळवार, जुलै ०४, २०१७ Edit This 0 Comments »





लिहिले तुझे नाव मी 
खिडकीच्या काचेवर ..
थेंबाची रीघ लागली
त्या एका अक्षरावर ..

विचार करता करता 
हरपुनी गेलो तुझ्यात ..
कळलेच नाही कधी 
पाऊस विरला क्षणात ..

   मिलिंद (नंदू) आग्रे . . . 

https://www.facebook.com/milind.agre.58 
Mb. No :- 8108821950

भाडेकरू या मनाचे ...

गुरुवार, जून २२, २०१७ Edit This 0 Comments »




अजूनही मनात डोकावते 

कवडसे तुझ्या आठवणींचे ..

गार झुळूक घालते येरझारा 

जणू तेच भाडेकरू या मनाचे ..


मिलिंद (नंदू) आग्रे . . . 
https://www.facebook.com/milind.agre.58 
Mb. No :- 8108821950

खेळ चालू राहिला ...

गुरुवार, जून ०८, २०१७ Edit This 0 Comments »


दव पडायचे त्या ओल्या काचेवर 

अन नाव मी गिरवायचो त्यावर ..

पावसाचे पुसणे अन माझे लिहिणे 

खेळ चालू राहिला हा रात्रभर ..


मिलिंद (नंदू) आग्रे . . . 

https://www.facebook.com/milind.agre.58 
Mb. No :- 8108821950

साधला मोका ...

गुरुवार, जून ०८, २०१७ Edit This 0 Comments »



गरम मक्याच्या कणसाची गोडी,

त्यात तिचे ते भीजलेले केस ..

आडोशाला उभे राहुनी आम्ही ,

साधला मोका असा तो थेट ..


मिलिंद (नंदू) आग्रे . . . 

https://www.facebook.com/milind.agre.58 
Mb. No :- 8108821950

तिच्या हसण्यानेच ,..

गुरुवार, जून ०८, २०१७ Edit This 0 Comments »



एक टपोरा थेंब ,
पावसाच्या सरींतून कोसळला ..
तिच्या हसण्यानेच ,
गालाच्या खळीतून निखळला ..

मिलिंद (नंदू) आग्रे . . .

https://www.facebook.com/milind.agre.58 
Mb. No :- 8108821950

तिच्या गालाच्या खळीत ..

शुक्रवार, जून ०२, २०१७ Edit This 0 Comments »


इवलासा थेम्ब तो पण,

स्वर्गात न्हाऊन गेला ..

तिच्या गालाच्या खळीत,

घर करून तो बसला ..


मिलिंद (नंदू) आग्रे . . . 
https://www.facebook.com/milind.agre.58 
Mb. No :- 8108821950

किती दिवसांचा अबोला ...

शुक्रवार, जून ०२, २०१७ Edit This 0 Comments »


दुरावलेल्या नात्यातला गोडवा 

त्या दामिनी ने दूर पळवला ..

किती दिवसांचा अबोला आमचा 

त्या सरींनी चटदिशी सोडवला ..


मिलिंद (नंदू) आग्रे . . . 
https://www.facebook.com/milind.agre.58 
Mb. No :- 8108821950

टपोऱ्या थेंबांनी ...

शुक्रवार, जून ०२, २०१७ Edit This 0 Comments »




आज त्या टपोऱ्या थेंबांनी 

चांगलाच कहर केला ..

मला डिवचून तो चक्क 

तिच्या ओठांवर विसावला ..

मिलिंद (नंदू) आग्रे . . . 
https://www.facebook.com/milind.agre.58 
Mb. No :- 8108821950

पुन्हा नव्याने ...

बुधवार, मे ३१, २०१७ Edit This 0 Comments »




पावसाची सर कोसळली की,

जणू नवा मोहरच फुलतो ...

आम्ही कवीवेडे तर नव्याने 

पुन्हा पावसाच्या प्रेमात पडतो ...


मिलिंद (नंदू) आग्रे . . . 
https://www.facebook.com/milind.agre.58 
Mb. No :- 8108821950

आठवणींच्या गदारोळात ...

मंगळवार, मे ३०, २०१७ Edit This 0 Comments »





आल्या गेल्या सरी कितीही

तरी तिची सर कुणालाच नाही.. 

आठवणींच्या गदारोळात

अव्वल स्थान कुणालाच नाही.. 

मिलिंद (नंदू) आग्रे . . . 
https://www.facebook.com/milind.agre.58 
Mb. No :- 8108821950

येईल ती सर...

सोमवार, मे २९, २०१७ Edit This 0 Comments »



आता लवकरच येईल ती सर,

जी दरवर्षी येऊन भिजवून जाते ..

सुकलेल्या मनाच्या पानांवर,

नवी हिरवी शाल फुलवून जाते ..



मिलिंद (नंदू) आग्रे . . . 
https://www.facebook.com/milind.agre.58 
Mb. No :- 8108821950