चंद्रालाही ग्रहण . . .

शनिवार, डिसेंबर १०, २०११ Edit This 0 Comments »

रूप ते बावन्नकशी,
किती ग ते असे रसाळ ,

मदनाची हि गोडी,
कोण बरे ते चाखणार ,

जीवे मारणारी नजर ,
का घायाळ नाही होणार ,

इतके देखणे लावण्य तुझे ,
का प्रेमात नाही पडणार ,

असा एक चंद्र असताना ,
साहजिकच ,
नभीच्या चंद्रालाही ग्रहण लागणार . . .

मिलिंद आग्रे . . . 
http://www.facebook.com/milindagre

अलवार मिठीत . . .

शुक्रवार, नोव्हेंबर २५, २०११ Edit This 0 Comments »
 
 
ती पहिली मिठी, अन तो गोड शहारा ,
तुझे ते प्रेम अन तो जिव्हाळा ,

त्या गाजवलेल्या मद रात्री ,
त्या फुलणाऱ्या गुलाबी पहाट,

या दोहोंमध्ये रंगलेले आपले ,
ते गोड निरंतर असे संवाद,

आज न जाणो ती कुठे आहे,
तिचे प्रेम अजूनही मनात दडलेले आहे,

या गुलाबी अशा थंडीने,
पुन्हा एकदा आठवण करून दिलीय ग

खूप थंडी आहे सखे,
मला अलवार मिठीत घे ना ग,

मिलिंद आग्रे . . . 
http://www.facebook.com/milindagre

मी विसरणार तरी कसा ?

शनिवार, नोव्हेंबर १२, २०११ Edit This 0 Comments »
 
 
अग तुझ्या हातात स्थिरावलेला हात ,
मी विसरणार  तरी  कसा  ?

अग तुझ्या श्वासात अडकलेला श्वास ,
मी विसरणार  तरी  कसा  ?

अग तुझा शहर आणणारा तो स्पर्श ,
मी विसरणार  तरी  कसा  ?

अग तुझ्या सोबत चा एक एक क्षण ,
मी मनात कैद करून ठेवलाय ग ..

अग त्या गोड रंजक  स्वप्नांना  ,
मी विसरणार  तरी  कसा  ?

एक वेळ मी माझी ओळख विसरेल ,
पण तुझे ते प्रेम तो जिव्हाळा ,
मी विसरणार  तरी  कसा  ?

मिलिंद आग्रे . . .

http://www.facebook.com/milindagre

रेशीम ओढणी . . .

रविवार, ऑक्टोबर ३०, २०११ Edit This 0 Comments »



असे चित्रपटासारखे नाही का होऊ शकत ?
तिची ती रेशीम ओढणी वाऱ्याने उडावी . . 
आकाशात स्वच्छंद विहार करुनी मग ,
अलगद माझ्या चेहऱ्यावर येऊन विसावी . . 
मिलिंद . . 

http://www.facebook.com/milindagre

* शुभ दीपावली *

सोमवार, ऑक्टोबर २४, २०११ Edit This 0 Comments »

पहिला दिवा उजळणार
आज प्रत्येकाच्या अंगणी

उडवूनी फटाक्यांचे बार
खुलणार रात्र आज नभी

गोड गोड दिवाळी फराळाचा
पसरणार खमंग दरवळ चोही

आनंदाने साजरी करू मित्र मैत्रिणींनो
सर्वांना माझ्याकडून शुभ दीपावली

* तुम्हाला अन तुमच्या परीवारांस*
*दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा *
 
मिलिंद आग्रे . . . 
http://www.facebook.com/milindagre

फक्त योगायोग . . .

गुरुवार, ऑक्टोबर १३, २०११ Edit This 0 Comments »

* योगायोग बाकी काही नाही *

एक तो पहिला पाऊस  . . !
ज्या पावसात मी माझ्या सखी सोबत
चिंब भिजलो होतो . . .

अन

एक हा परतीचा पाऊस . . !
ज्या पावसात मी तिच्या आठवणी सोबत 
चिंब भिजलो होतो . . .

मिलिंद आग्रे . . .
http://www.facebook.com/milindagre

काय ग पोरी . . .

बुधवार, ऑक्टोबर ०५, २०११ Edit This 0 Comments »


काय ग पोरी ते नखरे
अन तुझी ती सुंदर तर्हा
काय तो तुझा मेक अप
अन केसात हातभर गजरा . . .

काय ग ते तुझे ठुमकने
अन काय तो तुझा ठेका
मान मुरडत नाचतेस तेव्हा
वाटते लावण्याचा तू एक पेठा . .

जरा जपून ताल धर पोरी
असेल तुझ्यासाठी तो गरबा
पण आम्हा मुलांच्या नजरा
धरून असतात ना ग दबा . . .

पण आम्हाला हि माहितेय
तुझा साज शृंगार तो कशाला
अरे कोणाला नाही वाटत
सौंदर्याची स्तुती ऐकायला . . .

नवरात्री आणि विजयादशमी च्या हार्दिक शुभेच्छा

 
मिलिंद आग्रे . . . 
http://www.facebook.com/milindagre

* * शुभ दसरा * *

बुधवार, ऑक्टोबर ०५, २०११ Edit This 0 Comments »

 
माझ्या सर्व मित्र-मैत्रीणीना
* विजया-दशमीच्या *
मनापासून खूप-खूप आणि खूप
 
* हार्दिक शुभेच्छा *

मिलिंद आग्रे . . . 
http://www.facebook.com/milindagre

अन तो सुद्धा दूर . .

शुक्रवार, सप्टेंबर ३०, २०११ Edit This 0 Comments »


काल रातीचा चंद्र अगदी
तुझ्यासारखा भासत होता ,
अगदी म्हणजे अगदी तुझ्यासारखा . . .

तीच ती सुंदरता ,

तेच ते तेज ,

तीच ती अकड ,

तोच तो नूर ,

अन तो सुद्धा माझ्यापासून तेवढाच दूर . . .

मिलिंद आग्रे . . .
http://www.facebook.com/milindagre

* * नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा * *

बुधवार, सप्टेंबर २८, २०११ Edit This 0 Comments »


 * * *नव रात्रीचे हे* * *
 * * *नऊ दिवस* * *
* तुमच्या जीवनात *
* * *नवरंग भरो* * *

* * जय माता दी * *
* * नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा  * *
मिलिंद आग्रे
http://www.facebook.com/milindagre

असे हे सरकार आपुले . . .

रविवार, सप्टेंबर २५, २०११ Edit This 0 Comments »


आज जिथे तिथे होतायत बॉम्बस्फोट
यांना आवर तरी कोण घालणार
मात्र वर तोंड करून नक्की म्हणणार
बॉम्बस्फोट तर होताच राहणार
. . . .असे हे सरकार आपुले

आजही अंधारलेली गावे आहेत इथे
ज्यांनी सूर्याशिवाय उजेड पहिला नाही
पण या पांढरपेशीच्या पार्ट्या सभांना
रोषणाई कधी चुकली नाही
. . . .असे हे सरकार आपुले

करोडोंचा खर्च होतो त्या अतिरेक्यावर
का तर त्याला सुरक्षित ठेवावे
इथे एक रोज निष्पापाचा बळी जातोय
त्यांच्याकडे कोणी बरे ते पाहावे
. . . .असे हे सरकार आपुले

आजही इथला गरीब अर्धपोटी झोपतोय
वंचीत आहे तो पोटभर जेवणासाठी अजून
पण त्या पापाच्या धनी कसाबला मात्र
पोटभर बिर्याणी खायला आवर्जून
. . . . असे हे सरकार आपुले

या देशात बाहेरून येणाऱ्या अतिरेक्यांना
बिनधास्त असा प्रवेश मिळतो
मात्र याच मातीतल्या माणसांना
तो आधाराची ओळख नक्की मागतो
. . . .असे हे सरकार आपुले

 
मिलिंद आग्रे . . . 
http://www.facebook.com/milindagre

स्वर्गाची अनुभूती . . .

शनिवार, सप्टेंबर २४, २०११ Edit This 0 Comments »


ह्या गार गार थंडीमध्ये
तुझी ती उबदार मिठी हवी
मरण्याआधीच सोने मला 
स्वर्गाची अनुभूती ती यावी ..

मिलिंद आग्रे . . .
http://www.facebook.com/milindagre

सकाळची वेळ होती ..

बुधवार, सप्टेंबर २१, २०११ Edit This 0 Comments »

सकाळची वेळ होती
ऑफिस ला निघालो होतो
बस मध्ये बसून
   बाहेर डोकावत होतो ...

अलगद गारवा
सुटला होता हवेत
मस्त सुंदर वेळ ती
  जणू माझ्या कवेत ...

तितक्यात एका स्टोप वर
एक मुलगी चढली
काय सांगू तुम्हाला
  तिची ती नजर पहिली ...

साधा पेहराव तिचा
गळ्यात लाल ओढणी
सर्वांची नजर मग
  तिच्यावरच खिळली ...

आली ती गर्दीत
स्वताला सावरत
डोळ्यांवरची ती बट
  अलवार बाजूला सारत ...

ती गहिरी नजर शेवटी
माझ्यावर पडली
अन चक्क ती मुलगी
   माझ्या जवळ आली ...

जवळ येऊन माझ्या
काय म्हणावे तिने मला
म्हणाली लेडीज सीत आहे
  उठ लवकर, बसू दे मला ...

काय राव काय सांगू  कसला
हिरमोड झाला तिथे माझा
पण मी ऐकून घेतोय काय
  मी हि अस्सल पुजारी प्रेमाचा ..

म्हणालो तिला, बस ग तू
या जागेचा काही फायदा नाही
माझ्याशी मैत्री करून तर बघ
  मनात भरल्याशिवाय राहणार नाही

हे चार शब्द ऐकताच
ती अशी काही हसली
गुलाबांच्या त्या पाकळ्यांवर
काय मस्त लाली खुलली...
 
काय मस्त लाली खुलली

मिलिंद आग्रे . . . 
http://www.facebook.com/milindagre

कोणाची आस ?

मंगळवार, सप्टेंबर २०, २०११ Edit This 0 Comments »

 
गुंतुनी विचारांत तू
 
अशी का बसली आहे  ?
 
काय चालू आहे मनी
 
कोणाची ती आस आहे ?


मिलिंद आग्रे . . . 
http://www.facebook.com/milindagre

माझे अस्तित्व आहेस ग तू . . ..

शनिवार, सप्टेंबर १७, २०११ Edit This 0 Comments »



ती :-
तू आता पहिल्यासारखा का राहिला नाही ?

तो :-
कसा असणार ? आता तुझी साथ जी सोबतीला नाही ...

ती :-
आता परत कोणाच्या नजरेत गुंतशील का ?

तो :-
आता गुंतायला तशी पाणीदार नजर सापडणार नाही... 

ती :-
सोन्या इतके कशाला रे प्रेम केलेस रे माझ्यावर ?

तो :-
जीव तू माझा , अन स्वताचा जीव कोणाला प्रिय नाही ...

ती :-
सख्या तूच सांग मी काय बेवफा आहे काय ?

तो :-
सोने बेवफा आपले नशीब आहे ग तू बिलकुल नाही ..

ती :-
मग असे कर न , विसरून जा ना मला तू कायमचा ... 

तो :-
(जरा हसतच म्हणाला )
माझे अस्तित्व आहेस ग तू , तुला  विसरायला तू एक स्वप्न नाही ...



मिलिंद आग्रे . . . 
 http://www.facebook.com/milindagre

निदान ती तरी . . .

शुक्रवार, सप्टेंबर १६, २०११ Edit This 0 Comments »


एकांतात असलो कि ,
तिची आठवण येऊन छळते, 
बरय ना यार, निदान,
ती तरी येऊन सोबत देते..

मिलिंद आग्रे . . .
http://www.facebook.com/milindagre

प्रेम कहाणी . . .

शनिवार, सप्टेंबर १०, २०११ Edit This 0 Comments »


तुझी न माझी प्रेम कहाणी
अशी अधुरी कशी ग ?
दोन शब्दांमध्ये त्यांची वर्णी
सखे लावू तरी कशी ग ?

मिलिंद आग्रे . . .
 
http://www.facebook.com/milindagre

गजानन ...

शनिवार, सप्टेंबर ०३, २०११ Edit This 0 Comments »



ग-गजाचे मुख आहे ज्याच्या शिरावर ,
जा-जानुनी दुख भक्तांचे करी निर्वाण ,
न-नष्ट होई पाप ज्याच्या एका इशारयावर ,
न-नतमस्तक त्यांच्या चरणी या पामराची मान . . .

यंदाचा गणेशोत्सव सर्वांना सुख समृद्धी देओ ..
हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना 
मिलिंद आग्रे . . . 
http://www.facebook.com/milindagre

माझी आठवण . . .

बुधवार, ऑगस्ट ३१, २०११ Edit This 0 Comments »

पाऊस नभी दाटलाय

तू खिडकी काय बंद करतेय

माझी आठवण पण बघ न

कशी कवडसा शोधतेय


 मिलिंद (नंदू) आग्रे . . . 

https://www.facebook.com/milind.agre.58 

Mb. No :- 8108821950

हे मन . . ..

बुधवार, ऑगस्ट ३१, २०११ Edit This 0 Comments »

सोसाट्याच्या या वादळात

हे मन खरेच हरवलेले

रस्ता चुकलं ग ते, अन

नको तिथं जाऊन  फसले 

मिलिंद आग्रे . . .

पाऊस ....

शनिवार, ऑगस्ट २७, २०११ Edit This 0 Comments »
 
या मुसळधार पावसाने ,
आज थैमान घातलेय ,
तिच्या आठवणी मध्ये ,
चिंब भिजवून सोडलेय . . .
मिलिंद . . .

निसर्ग ...

शनिवार, ऑगस्ट २७, २०११ Edit This 0 Comments »

निसर्गाचे सानिध्य हे ,
किती वेड लावते या मना ,
ताल छेडून सुरांची ते,
सजवते सरगम या मना ,
मिलिंद ...

काय डौलाने झुलतेय . . .

शनिवार, ऑगस्ट ०६, २०११ Edit This 0 Comments »


काय   डौलाने  झुलतेय  ग

ती नथ तुझ्या नाकात

सौंदर्य  तर  खुलतेय  ग

पण अडथळा का प्रेमात

मिलिंद आग्रे

मित्र बनवा फेसबुक वर . . .

गुरुवार, ऑगस्ट ०४, २०११ Edit This 0 Comments »
 


नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो 
मला जॉईन करा फेसबुक वर 
या id ne सर्च करा
 
धन्यवाद 
मिलिंद आग्रे 

मन ठेवायचं गहाण ...

बुधवार, ऑगस्ट ०३, २०११ Edit This 0 Comments »

असा कसा खेळ झाला नशिबाचा ,

आज आसवे कोसळतायत बेभान ,

आहे का कोणी गिर्हाईक मित्रांनो ,

या पाखराच मन ठेवायचं गहाण  ...

मिलिंद आग्रे ...

आठवतंय का तुला ?

सोमवार, जुलै २५, २०११ Edit This 0 Comments »


आठवतंय का तुला ?

त्या पहिल्याच भेटीच्या रिमझिम पावसात 

तुझे हात माझ्या हातात गुरफटले होते ...

आपल्या त्या निर्णयावर त्या पावसानेही 

जणू फुलांचे टपोरे थेंब सोडले होते ...


 मिलिंद (नंदू) आग्रे . . . 

https://www.facebook.com/milind.agre.58 

Mb. No :- 8108821950

शहारा ...

बुधवार, जुलै २०, २०११ Edit This 0 Comments »


शहारा आणतो ग तुझा स्पर्श ,
शिरतेस तू जेव्हा मिठीत माझ्या ,
आवर घाल ग तुझ्या स्पर्शाला ,
कळतंय काय आहे मनात तुझ्या . . .
मिलिंद आग्रे . . . 

नखरेल हि रात्र...

गुरुवार, जुलै १४, २०११ Edit This 0 Comments »




नखरेल हि रात्र माझी सोने ,
तुझ्याच मिठीत विरून जावी,
पहाटे पुन्हा तुझा चेहरा पाहून,
माझी अलगद झोपमोड व्हावी,
मिलिंद आग्रे ...

सांज वेडी ...

गुरुवार, जुलै १४, २०११ Edit This 0 Comments »

सांज वेडी खुळी सरणार रे ,
मावळत जाणार हा प्रकाश ,
खुलणार नभी त्या चंद्रमा ,
फक्त काही क्षणांचा अवकाश ..
मिलिंद आग्रे ...

असा दिवस कधी येईल ...

बुधवार, जुलै १३, २०११ Edit This 0 Comments »

घराच्या बाल्कनीतून उभी राहून 
सोने तू चंद्राकडे पाहत राहील ...

मग दब्या पावलाने मी मागून येऊन
तुझ्या कमरेला अलगद विळखा घालीन ...

तू हि हळूच मग मागे वळून
माझ्या नजरेला नजरकैद देशील ...

त्या बोलक्या अशा धुंद नजरेने
तू मला अलगद मिठीत घेशील ..

प्रसंगावधान राखून मग चंद्रही
लाजेने त्या ढगाआड लपून जाईल ...

सांग न सोने असा दिवस कधी येईल ...
कधी येईल.. कधी येईल ..

सोने साथ देशील का कायमचा.....

बुधवार, जुलै ०६, २०११ Edit This 0 Comments »


आकाशी सप्तरंगी ईंद्रधनुष्य,
तुझ्या प्रत्येक भेटित नवा हर्ष,
तुझा तो घायाळ करणारा कटाक्ष,
तुझा तो चोरुन मिळणारा स्पर्श...

तुझ्या गालावरची ती खळी,
जणु ते मन माझे जाळी,
नाक तुझे ते चाफेकळी,
न उमललेली तु नाजुक कळी...

गुलाबाच्या पाकळ्यासारखे ओठ लाल,
हरणीसारखी नखरेल चाल,
रुपाला तुझ्या सोने तुच आवर घाल,
मादक नजर तुझी करी जिवाला घायाल...

तुझा तो तोरा, डौलदार थाट,
सुडौल बांधा, रेशमी असा हात,
शरिराचा जणु वळणदार घाट,
न उलगडणारि तु एक पायवाट...

तुझे ते सुंदर पाणीदार डोळे,
पावसात चिंब शरिर भिजलेले,
उगाच पाय घसरेल कि काय पण,
मी स्वतःच स्वतःला सावरले...

तुझ्या पायातले ते पैंजण,
कानात झुमके, हातात कांकण,
जणु मथुरेच्या बाजाराला,
निघालेली सुंदर तु गवळण...

सोने फक्त तूच मला म्हणाली,
म्हणुन मी ही कविता रचली,
हा कवितेचा छोटा प्रयत्न पाहुन,
खुलेल का गं तुझ्या ओठांची लाली...

माझा हा पहिलाच प्रयत्न कवितेचा,
मान राखुन आपल्या या प्रेमाचा,
खरचं खुप प्रेम केलय तुझ्यावर मी,
सांग सोने साथ देशील का कायमचा...

सांग सोने साथ देशील का कायमचा...

सांग सोने साथ देशील का कायमचा...

मिलिंद आग्रे

माझे हृदय ...

मंगळवार, जून २८, २०११ Edit This 0 Comments »

माझे हृदय आता माझे नाही ,

ते आता तुझे झाले आहे ,

माझ्यासाठी श्वास घेणे ,

त्याने कधीच सोडले आहे . . .

मिलिंद आग्रे

गोड गुलाबी ओठ ..

गुरुवार, जून १६, २०११ Edit This 0 Comments »



तिच्या गोड गुलाबी ओठांचा मधुर रस  ,

 माझ्या शरीरात असा काही भिनलाय ,

काय सांगायचं तुम्हाला सवंगड्याहो ,

या पट्ठ्याने आता चहा प्यायचाच सोडलाय ...

मिलिंद आग्रे

सखे तू . . .

सोमवार, जून १३, २०११ Edit This 0 Comments »


सखे तू पावसात भिजत आहे ,

म्हणून पावसाला पण राहवले नाही ,

तुला चिंब चिंब भिजवायचे म्हणून ,

त्याने हि बरसायचे थांबवले नाही . .

मिलिद आग्रे ...

तिचे रूप . . .

सोमवार, जून १३, २०११ Edit This 0 Comments »

तिच्या हातातल्या बांगड्याची छनछन ,
 
माझ्या कानात घर करून गेली  ,
 
तिचे चिंब भिजलेले रूप पाहून ,
 
स्वर्गाची अप्सरा हि लाजून गेली ...
मिलिंद आग्रे ...

वाट

रविवार, जून १२, २०११ Edit This 0 Comments »
सखे तू गेलीस त्या वाटेला_
अजून डोळे लावून बसलोय_
वाट विरत चाललीय पण_
अजून आस लावून बसलोय_

मिलिंद आग्रे




त्या पहिल्या रिमझिम ...

सोमवार, मे २३, २०११ Edit This 0 Comments »


त्या पहिल्या रिमझिम अशा धुंद पावसात ,
मला तुझ्या मिठीत चिंब चिंब भिजायचंय ,
आणि भिजता भिजता तुझ्या नकळत मला ,
तुझ्या ओठांवरचा थेंब माझ्या ओठांनी टीपायचंय . . .

शक्य आहे का ...

सोमवार, मे १६, २०११ Edit This 0 Comments »

शक्य आहे का तुला कायमचे विसरणे ,
शक्य आहे का तुझ्या आठवणींतून सावरणे , 
तू तर एक अनमोल भेट आहे माझ्या प्रेमाची , 
शक्य आहे का त्या भेटीची किंमत चुकवणे . . .
                                                        . . . . . . . . . मिलिंद आग्रे 

सुंदर ती संध्याकाळ ...

सोमवार, मे १६, २०११ Edit This 0 Comments »

नुकताच कुठे सूर्य अस्ताला गेला असेल ,
आकाशी काळे ढग जमा झालेले असेल ,
मस्त असा थंड गार वारा वाहत असेल ,
अशा या रम्य संध्याकाळी ,
हातात चहा आणि आठवणीत फक्त तीच असेल 
आता तुम्हीच थोडा विचार करा ,
किती सुंदर ती संध्याकाळ असेल . . .
. .  . . . . ...मिलिंद आग्रे

उन्हाळ्यातच पावसाची सर ..

शुक्रवार, मे ०६, २०११ Edit This 0 Comments »
 
का जाणो आत्ताच नकळत तुझी आठवण आली
जशी उन्हाळ्यातच अवकाळी पावसाची सर आली
मी अलगद स्पर्श केला त्या सरींच्या टपोर्या थेंबांना
तर त्या प्रत्येक थेंबात मला तुझी छबी नजर आली ...

प्रेम ...

शुक्रवार, मे ०६, २०११ Edit This 0 Comments »
 
खूप सहजतेने कोणावर हे मन जडत ,
पण ते तिला सांगण खूप जड जात ,
घेवून जाते प्रेम अशा एका वाटेवर ,
जेथून माग फिरन खूपच अवघड असत  . . .

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ...

सोमवार, एप्रिल ०४, २०११ Edit This 0 Comments »

सर्वांना गुढीपाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ....
हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना आनंददायी
आणि सुख - समृद्धीचे जावो हीच सदिच्छा ..

सौंदर्य पाहून ...

शुक्रवार, एप्रिल ०१, २०११ Edit This 0 Comments »
 
 
सौंदर्य पाहून कधीच प्रेम होत नाही ,
कारण ते आज आहे उद्या नसेल ,
त्यासाठी एकमेकांवर विश्वास हवा ,
कारण तोच आयुष्यभर सोबतीला असेल ...

आयुष्याचा ...

मंगळवार, मार्च २९, २०११ Edit This 0 Comments »

आयुष्याचा जास्त विचार करू नये ..
प्रेमात परीणामांची पर्वा करू नये ..
असे एका साथीदाराला अंधारात ठेवून ..
दुसरयाशी आपले सुत जुळवू नये ...

वारयानेच माझी मस्करी ...

शुक्रवार, मार्च २५, २०११ Edit This 0 Comments »


तू नाही आलीस ,तुझी आठवण येऊन गेली ..
तुला भेटण्याची आता इच्छाच नाही राहिली ..
तरी पण भास झाला मनाला ,वाटले कि तू आली ..
पण दार उघडून पाहतो तर काय ,
त्या खट्याळ वारयानेच माझी मस्करी केली ......

खूप आस होती ग ...

बुधवार, मार्च २३, २०११ Edit This 0 Comments »


खूप आस होती ग तुला एकदा तरी भेटण्याची
माझ्या मनातल्या भावना तुला सांगण्याची
निदान मी मेल्यावर तरी मला गळ्याशी लाऊन रड
खरच खूप इच्छा होती तुला गळ्याशी कवटाळण्याची .

धुळवड

गुरुवार, मार्च १७, २०११ Edit This 0 Comments »

मथुरेच्या गवळणीच्या घोळक्यात ...
मला साजेशी एक गवळण शोधतोय ...
उधळेन माझ्या सावल्या रंगावर गुलाल ..
अशी सुंदर एक राधा शोधतोय ...
* धुळवड च्या हार्दिक शुभेच्छा *

देवाने जेव्हा ..

मंगळवार, मार्च १५, २०११ Edit This 0 Comments »



देवाने जेव्हा प्रेम निर्माण केले असेल

त्याने ते स्वतःवर देखील अनुभवले असेल

प्रेमात काय-काय भोगावे लागते हे कळल्यावर

तो देखील नक्कीच मनापासून रडला असेल


मिलिंद (नंदू) आग्रे . . .



https://www.facebook.com/milind.agre.58 

Mb. No :- 8108821950

तुझ्याविना जगू कसे ...

शनिवार, मार्च १२, २०११ Edit This 0 Comments »


रुसण्याच्या आधी मनवू कसे ते शिकव
रडण्याच्या आधी हसवू कसे ते शिकव
जर जायचेच असेल माझ्यापासून दूर
तर तुझ्याविना जगू कसे ते शिकव ....
 

अपेक्षा ...

शुक्रवार, मार्च ११, २०११ Edit This 0 Comments »
 
जीवनाकडून कुठल्याच अपेक्षा ठेवू नका,
कारण अपेक्षा असूनही,
जर का ती गोष्ट आपल्याला मिळाली नाही.
तर आपले मन दुखावले जाते,
आणि जर,अपेक्षा न ठेवता काही मिळाले तर,
त्यातून मिळणारा आनंद हा अफलातून असतो

गालावरची बट ...

गुरुवार, मार्च १०, २०११ Edit This 0 Comments »
 
 
तुझ्या गालावर आलेली केसांची बट ,
मला खूप जळवून सोडते ,
वेटोळे घेत घेत का होईना ,
ती तुझ्या गुलाबी गोबर्र्या गालाला ,
क्षणासाठी स्पर्श करून जाते ...