सोने साथ देशील का कायमचा.....

बुधवार, जुलै ०६, २०११ Edit This 0 Comments »


आकाशी सप्तरंगी ईंद्रधनुष्य,
तुझ्या प्रत्येक भेटित नवा हर्ष,
तुझा तो घायाळ करणारा कटाक्ष,
तुझा तो चोरुन मिळणारा स्पर्श...

तुझ्या गालावरची ती खळी,
जणु ते मन माझे जाळी,
नाक तुझे ते चाफेकळी,
न उमललेली तु नाजुक कळी...

गुलाबाच्या पाकळ्यासारखे ओठ लाल,
हरणीसारखी नखरेल चाल,
रुपाला तुझ्या सोने तुच आवर घाल,
मादक नजर तुझी करी जिवाला घायाल...

तुझा तो तोरा, डौलदार थाट,
सुडौल बांधा, रेशमी असा हात,
शरिराचा जणु वळणदार घाट,
न उलगडणारि तु एक पायवाट...

तुझे ते सुंदर पाणीदार डोळे,
पावसात चिंब शरिर भिजलेले,
उगाच पाय घसरेल कि काय पण,
मी स्वतःच स्वतःला सावरले...

तुझ्या पायातले ते पैंजण,
कानात झुमके, हातात कांकण,
जणु मथुरेच्या बाजाराला,
निघालेली सुंदर तु गवळण...

सोने फक्त तूच मला म्हणाली,
म्हणुन मी ही कविता रचली,
हा कवितेचा छोटा प्रयत्न पाहुन,
खुलेल का गं तुझ्या ओठांची लाली...

माझा हा पहिलाच प्रयत्न कवितेचा,
मान राखुन आपल्या या प्रेमाचा,
खरचं खुप प्रेम केलय तुझ्यावर मी,
सांग सोने साथ देशील का कायमचा...

सांग सोने साथ देशील का कायमचा...

सांग सोने साथ देशील का कायमचा...

मिलिंद आग्रे

0 टिप्पणी(ण्या):