खरेच तू खूप छान लाजतेस ..

गुरुवार, जून १२, २०१४ Edit This 0 Comments »


तुला काहितरी बोलावेस वाटत मला.......

"तु खूप छान लाजतेस "
असं तुला म्हणावेस वाटत मला........


चिंब बरसावी एक अलवार सर ,
तशी मोहरूनी ओथंबतेस ... खरेच तू ..


लाजाळूच्या झाडासारखे तू
तसे अंग चोरून घेतेस.... खरेच तू ..


थंड गार वार्याची जणू झुळूक 
तशी शहारा आणून जातेस.... खरेच तू ..


खरेच तू खूप छान लाजतेस ....

मिलिंद आग्रे . . . 
https://www.facebook.com/milind.agre.58

जाता जाता ...

गुरुवार, मे २२, २०१४ Edit This 0 Comments »


जाता जाता तिने इशारा केला ,
पुढच्या भेटीचा तिने वायदा दिला ..
कशी असणार ती भेट या विचारात ,
डोळ्याला डोळाच नाही लागला ..

मिलिंद आग्रे . . . 
https://www.facebook.com/milind.agre.58

प्रत्येक भेट ....

गुरुवार, मे २२, २०१४ Edit This 0 Comments »

तुझ्या सोबतची प्रत्येक भेट सरताना ,
हातातला हात सोडवतच नाही ...  
अशी नजर रोखून पाहू नकोस ,
परतीला मग पाय वळतच नाही ...

मिलिंद आग्रे . . .
https://www.facebook.com/milind.agre.58

मैत्रीची नाजुक कळी ...

शनिवार, मे १७, २०१४ Edit This 0 Comments »


मैत्रीची नाजुक कळी,
तेव्हा कुठे हर्षाने फुलते..
जेव्हा एकमेकांचे हितगुज,
हक्काने सांगण्यात येते..

मिलिंद आग्रे . . . 
https://www.facebook.com/milind.agre.58

नयनांची ही भाषा ... :)

शनिवार, मे १७, २०१४ Edit This 0 Comments »


नयनांची ही भाषा घे तु समजुनी,
भाव त्यातले ओळखुन घे न जरा..
छेड काढी खट्याळ वारा माझी,
राजसा तुच त्याला समजव न जरा....

मिलिंद आग्रे . . .
https://www.facebook.com/milind.agre.58

रुसलास का ... :)

शनिवार, मे १७, २०१४ Edit This 0 Comments »


रुसलास का रे असा,
गाल आता फुगवु नको ..
नाकावरच्या शेंड्याला,
लाल होऊ देऊ नको .. 

मिलिंद आग्रे . . . 
https://www.facebook.com/milind.agre.58

पदराआड तोंड लपवुन ..

शनिवार, मे १७, २०१४ Edit This 0 Comments »


पदराआड तोंड लपवुन,
नजर अशी काय चोरते ..
काळजात घाव घालतेस,
जेव्हा ईश्य अशी लाजते ..

मिलिंद आग्रे . . . 
https://www.facebook.com/milind.agre.58

तुझ्या रुपाच्या ..

शनिवार, मे १७, २०१४ Edit This 0 Comments »

तुझ्या रुपाच्या लखलख चांदण्याचा,
सडा पडलाय ग सखे अंगणात ..
चंद्र नभीचा ताटकळत बसुनी,
चांगलाच रमलाय तुला पाहण्यात ..

मिलिंद आग्रे . . . 
https://www.facebook.com/milind.agre.58

तर्हा तुझी रुसण्याची ..

शनिवार, मे १७, २०१४ Edit This 0 Comments »


तर्हा तुझी ती रुसण्याची,
लईचं भारी वाटते मला..
का कुणास ठावुक मगं,
मुद्दाम छेडावेसे वाटते तुला... 

मिलिंद आग्रे . . . 
https://www.facebook.com/milind.agre.58

कवी मन ..

शनिवार, मे १७, २०१४ Edit This 0 Comments »


कवी मन जागे तर होतेचं,
फक्त त्यावर धुळ बसलेली ..
तुझी हलकी फुंकर मिळताचं,
ती कुठच्या कुठे उडुन गेली ..

मिलिंद आग्रे . . .
https://www.facebook.com/milind.agre.58

मस्त गार वारा ..

शनिवार, मे १७, २०१४ Edit This 0 Comments »

मस्त गार वारा असा बेभान सुटला,
त्या वारयाने केली राव भलतीच लगट..  
पदर उडवुन तिचा माझ्या चेहरयावर,
दाखवुन दिली ना त्याने स्वत:ची वट.. 

मिलिंद आग्रे . . . 
https://www.facebook.com/milind.agre.58

तुझ्या डोळ्यातले ..

शनिवार, मे १७, २०१४ Edit This 0 Comments »

तुझ्या डोळ्यातले काजळ,
कसे लखलखतेय बघ..
सुंदर नथ ती नाकातली,
कशी झुलतेय ती बघ..

मिलिंद आग्रे . . . 
https://www.facebook.com/milind.agre.58

रातच्याला एक सपन पडल ..

शनिवार, मे १७, २०१४ Edit This 0 Comments »


रातच्याला एक सपन पडल ,
त्यात मला तूच दिसली ..
नजरेचे शर मारीत तू ,
गहिरी चाल तू चालली ..

कळी तुझ्या ओठांची ,
मस्त पाकळ्यासारखी खुलली ..
मोहरून गेलो पुरता मी ,
चांगलीच भुरळ पडली ..

हात घेता हाती तुझा मग ,
अंगावर काटे उभे राहिले ..
खांद्यावर डोके ठेवता माझ्या ,
मला एक वेगळेच सुख वाटले ...  

स्वप्नच होते ते माझे ,
एक स्वप्नच शेवटी ठरले .. 
पण काही असो स्वप्नात मात्र ,
मनाला मी चांगलेच रमावले ..

मिलिंद आग्रे . . . 
https://www.facebook.com/milind.agre.58

स्वप्न पहाटेचे ..

शनिवार, मे १७, २०१४ Edit This 0 Comments »

स्वप्न पाही पहाटेचे रंगीन ,
त्यात तुज गुलाबी चेहरा दिसतो ..
आवरू कसे सखे या मनाला ..
जिथे तिथे फक्त तुझा भास होतो ..

मिलिंद आग्रे . . . 
https://www.facebook.com/milind.agre.58

डोळ्यातल्या मुक भावना ..

शनिवार, मे १७, २०१४ Edit This 0 Comments »


डोळ्यातल्या मुक भावना,
तुला काही समजतायत का ?
किती प्रेम आहे तुझ्यावर,
तुला काही उमजतेय का ?


मिलिंद आग्रे . . . 
https://www.facebook.com/milind.agre.58

लाजु नकोस ...

शनिवार, मे १७, २०१४ Edit This 0 Comments »

लाजु नकोस एवढे राणी,
डुलाया लागतो हा मनमोर..
उगा बोबाटा होईल गावामंधी,
नक्की कोन तो चितचोर ..

मिलिंद आग्रे . . . 
https://www.facebook.com/milind.agre.58

तुझ्या नजरेत...

शनिवार, मे १७, २०१४ Edit This 0 Comments »


तुझ्या नजरेत पाहता पाहता,
मी कुठेतरी हरवुनच जातो..
वेळ मात्र पटापट सरते म्हणुन,
तिच्यावर डुग धरुन बसतो ..

मिलिंद आग्रे . . . 
https://www.facebook.com/milind.agre.58

गुपित माझ्या मनातले ...

शनिवार, मे १७, २०१४ Edit This 0 Comments »

गुपित माझ्या मनातले ,
तुच आता ओळखुन घे...  

नयनांची अबोल भाषा ,
तुच आता समजुन घे.. 

थकले रे मी राजसा आता,
तुला ईशारे देता देता..  

माझी मुकी प्रित ही वेड्या
कळेल का तुला न सांगता  ...  :(

मिलिंद आग्रे . . . 
https://www.facebook.com/milind.agre.58

तुझ्या पापण्यांच्या ...

शुक्रवार, मे ०२, २०१४ Edit This 0 Comments »




तुझ्या त्या पापण्यांच्या खाली

घटकाभर विसावा घेईन म्हणतो ..

ओल्या टपोर्या थेंबांना त्या ,

अलगद टिपून घेईन म्हणतो ..


मिलिंद आग्रे . . . 

 https://www.facebook.com/milind.agre.58

हृदयी वसंत ...

शुक्रवार, मे ०२, २०१४ Edit This 0 Comments »




हृदयी वसंत फुलला ग राणी ,

तुझ्या प्रीतीची चाहूल लागली ..

लई ग्वाड तुझ वळून पाहणे

नजरेनेच जीवाची घालमेल झाली ..


मिलिंद. . .
https://www.facebook.com/milind.agre.58

चांदण्या रातीला ...

शुक्रवार, मे ०२, २०१४ Edit This 0 Comments »



चांदण्या रातीला त्या,

चंद्राची अतूट साथ ..

किती वाट पाहू सजना,

थकले घालूनी रे साद ..

मिलिंद ... 
https://www.facebook.com/milind.agre.58

अवसेची ती रात..

शुक्रवार, मे ०२, २०१४ Edit This 0 Comments »

अवसेची ती भयाण रात,

रातकिड्यांची किर्रर्र साथ ..

माझे मन मात्र तुला शोधी ,

काजव्याच्या मंद प्रकाशात ..


मिलिंद आग्रे . . .
https://www.facebook.com/milind.agre.58

रेशीम विळखा...

सोमवार, एप्रिल २८, २०१४ Edit This 0 Comments »

रेशीम विळखा घाल साजणी ,
असा शहारा देऊन जाऊ नको ..
किती ग करशील नखरे आता ,
असे नाक मूरडूनि जाऊ नको ..

मिलिंद आग्रे . . . 
https://www.facebook.com/milind.agre.58

बेधुंद रात्र ...

रविवार, एप्रिल २७, २०१४ Edit This 0 Comments »




सुंदर अशी बेधुंद रात्र हि ,
तुझ्या मिठीत विरून जावी ..
अशा या गुलाबी रातीची ,
पहाट ती कधीच न व्हावी ..

मिलिंद आग्रे . . . 
https://www.facebook.com/milind.agre.58

पौर्णिमेचा चंद्र..

शनिवार, एप्रिल २६, २०१४ Edit This 0 Comments »

पौर्णिमेचा लखलखता चंद्र ,
हा भलताच ग लबाड ..
माझी सखी येता अंगणात ,
लागलीच जाई ढगाआड ..

मिलिंद ..
https://www.facebook.com/milind.agre.58

छेडलीस ग ..

शनिवार, एप्रिल २६, २०१४ Edit This 0 Comments »

छेडलीस ग तू तार सये ,
या माझ्या वेड्या मनाची ..
गेलो धुंदीत न्हावूनी मी ,
नशाच अशी जुलमी प्रीतीची ..

मिलिंद..
https://www.facebook.com/milind.agre.58

गालावरची खळी . . .

गुरुवार, एप्रिल २४, २०१४ Edit This 0 Comments »

गालावरची खळी तुझ्या ,

जणू अशी काही भासते ..

तुझ्या सर्वांग सौंदर्याचा ,

जणू एकट्याने ठेका घेते ..


मिलिंद आग्रे . . . 
https://www.facebook.com/milind.agre.58

तुझ्या प्रितिने ...

गुरुवार, एप्रिल २४, २०१४ Edit This 0 Comments »




तुझ्या प्रितिने मला,


अगदी बेजार केलेय गं..
रात-दिस झोप नाही,
काय जादु केलीस गं..
.

मिलिंद आग्रे . . . 
https://www.facebook.com/milind.agre.58

लाजून लाजून...

बुधवार, एप्रिल २३, २०१४ Edit This 0 Comments »

लाजून लाजून जालीस कावरी बावरी ,
हरवून गेलीस तू स्वताचे भान ..
अग इतकी काय तुझी लाडिक अदा ,
होई जीवाची पार ती ओढाताण ...
   

मिलिंद आग्रे . . . 
https://www.facebook.com/milind.agre.58

म्हंटल तर ....

मंगळवार, एप्रिल ०८, २०१४ Edit This 0 Comments »


म्हंटल तर ..

म्हंटल तर ..
कुणाची आठवण येतेय,
पण ...?
वाटत उगाच ते भरकटयं..

म्हंटल तर ..
कुणाची चाहूल लागतेय,
पण ...?
उगाचच तो निव्वळ भास वाटतोय..

म्हंटल तर ..
मनात खूप काहूर माजलेय,
पण ...?
ते बहुतेक एकांतामुळे वाटतेय..

म्हंटल तर ..
आज भेट होईल वाटतेय,
पण ...?
नंतर मन स्वतःला वेड ठरवतंय..

म्हंटल तर ..
तिची उबदार मिठी जाणवतेय,
पण ...?
अंगातल जरकीनच उब सोडतय..

म्हंटल तर ..
तिचा तो स्पर्श जवळ भासतोय,
पण ...?
प्रत्यक्षात माझाच हात सलगी साधतोय..

म्हंटल तर ..
काहीतरी वेगळेच संकेत वाटतायत,
पण ...? काही नाही 
शेवटी हे सर्व मृगजळच कळून चुकतंय..

मिलिंद आग्रे . . . 
https://www.facebook.com/milind.agre.58

प्रेमात अन युद्धात सर्व काही माफ....

शनिवार, मार्च २२, २०१४ Edit This 0 Comments »


ऐकलेय कि ,

प्रेमात अन युद्धात सर्व काही माफ असते ...

पण प्रेमापेक्षा आपले युद्धच बरे..

कारण युद्धात तुम्ही एकतर जगाल किंव्हा मराल..

पण ...???

प्रेम तुम्हाला धड जगूही देणार नाही आणि धड मरू ही ... :( 

मिलिंद आग्रे . . . 
https://www.facebook.com/milind.agre.58

तुझी आठवण म्हणजे ...

बुधवार, मार्च १९, २०१४ Edit This 0 Comments »


तुझी आठवण म्हणजे,

अवकाळी पावसाची सर ...

वाट्टेल तेव्हा यावी अन,

बरसून निघून जावी ... 

मिलिंद आग्रे . . . 

https://www.facebook.com/milind.agre.58

नारी घे अवतार चंडीचा तू ...

शनिवार, मार्च ०८, २०१४ Edit This 0 Comments »



"माझ्या आई समवेत सर्व महिलांना "

नारी घे अवतार चंडीचा तू 
पण संसाराला तोडून जाऊ नको .. 

दे झुगारून बंध सारे तू 
पण कायदा सोडून चालू नको .. 

अत्याचाराला बळी पडू नको 
पण अशी वेळहि येऊ देऊ नको .. 

तुझ्या हाती दोर भावी आयुष्याची 
पण तूच पदर सोडून देऊ नको .. 

चूल न मुल हा नियमच बदलून टाक
पण घराकडे पाशिमात्य  दुर्लक्ष करू नको .. 

तुच आहेस जिजाऊ तूच सावित्री 
पण हल्लीच्या भुलू नको .. 

कर प्रगती हर एक क्षेत्रात तू
पण संस्कृती आपली सोडू नको ..

पेहराव भले कितीही बदललेस तू 
पण साडीत रूप खरे तुझे विसरू नको .. 

कितीही रंगरंगोटी केलीस चेहऱ्यावर 
पण खरा दागिना मंगळसूत्र चुकवू नको ..

प्रेमाच्या आमिषाला न जुमानता 
कधीही चुकीचा निर्णय तो घेऊ नको ..

दे पदर खोचून साडीचा न जा सामोरे 
पण एकदा घेतलेला वसा टाकू नको ..

मुलगा न मुलगी भेदभाव खूप करतात 
पण तूहि एक मुलगी होतीस हे विसरू नको ..

हे कलयुग आहे, जुना जमाना गेला 
आता मात्र मागे हटायचे नाव घेऊ नको ..

सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा :)
येणारा प्रत्येक दिन तुमचाच असो :)

मिलिंद आग्रे . . . 
https://www.facebook.com/milind.agre.58

ओघळणारा थेंब तो . . .

शनिवार, मार्च ०८, २०१४ Edit This 0 Comments »
ओघळणारा थेंब तो ,

ओठांवर येउन थांबला . . .

क्षणिक प्रवास त्याचा ,

काही क्षण सुखावला . . .

मिलिंद . . .


ओघळणारा थेंब तो ,

ओठांवर येउन थांबला . . .

क्षणिक प्रवास त्याचा ,

काही क्षण सुखावला . . .


मिलिंद आग्रे . . . 

https://www.facebook.com/milind.agre.58

हरवलीय वाट . . .

शनिवार, मार्च ०८, २०१४ Edit This 0 Comments »
हरवलीय वाट
दिशा सापडत नाही . . .

पायवाट रोजचीच
पण चालवत नाही . . .

एरवी गोड वाटणारी
तिची ती आठवण . . .

न जाणो आज का
गोड वाटत नाही . . .

मिलिंद . . .

हरवलीय वाट
दिशा सापडत नाही . . .

पायवाट रोजचीच
पण चालवत नाही . . .

एरवी गोड वाटणारी
तिची ती आठवण . . .

न जाणो आज का
गोड वाटत नाही . . .

मिलिंद आग्रे . . .

https://www.facebook.com/milind.agre.58

नाकाच्या शेंड्याला . . .

शनिवार, मार्च ०८, २०१४ Edit This 0 Comments »
नाकाच्या शेंड्याला तिच्या 
जेव्हा लाल तरी येते . . .
तिच्या त्या रुसण्याने 
आमचे प्रेम अजून खुलते . . . 
मिलिंद . ..

नाकाच्या शेंड्याला तिच्या 


जेव्हा लाल तरी येते . . .



तिच्या त्या रुसण्याने 



आमचे प्रेम अजून खुलते . . . 



मिलिंद आग्रे . . . 

https://www.facebook.com/milind.agre.58

अब तो आयना भी . . .

शनिवार, मार्च ०१, २०१४ Edit This 0 Comments »


अब तो आयना भी मुकर गया,

यह कह के मुझसे . . .

अब जाके मेरी याद आई,

जब सनम ने आँखे फेरली तुझसे . . .


मिलिंद आग्रे . . . 
 http://www.facebook.com/milindagre58

साला काय आयुष्य आहे हे . . . ?

गुरुवार, फेब्रुवारी २७, २०१४ Edit This 0 Comments »

साला काय आयुष्य आहे हे ?

कधीच वाटले नव्हते
इतके अवघड होईल  ,
आपल्याच देशात आपल्यालाच
जगणे अवघड होईल . . .

कधीच वाटले नव्हते
इतकी महागाई वाढेल ,
आपल्याच देशात आपल्यालाच
खाणे मुश्कील होईल . . .

कधीच वाटले नव्हते
इतकी लाचारी वाढेल ,
आपल्याच देशात आपल्यालाच
राहणे मुश्कील होईल . . .

कधीच वाटले नव्हते
इतकी असुरक्षितता वाढेल ,
आपल्याच देशात आपलाच
जीव मुठीत येईल . . .

घरातून निघणारा मुलगा
किती सहज बोलून जातो ,
आई चल येतो ग मी ..
संध्याकाळी लवकर येईल . . .

पण खूप आहेत अशा माउली
ज्यांचा मुलगा परतला नाही ,
पण दाराकडे आस लाऊन बसते माउली
अन म्हणते माझ बाळ बोललेय मला . .

आई संध्याकाळी लवकर येईल . . .

मिलिंद . . .
https://www.facebook.com/milind.agre.58