दुसरी अप्सरा . . . . . .

मंगळवार, एप्रिल २४, २०१२ Edit This 0 Comments »




सोडते साथ जीवनात जेव्हा प्रेयसी ,
जीवन कसे निराश होऊन जाते यार , 
मग वाटत सोडून द्याव हे जग . . पण 
लगेच दुसरी अप्सरा मनात भरते यार .


मिलिंद आग्रे . . .
http://www.facebook.com/milindagre

प्रेम कसे करायचे . . . . ?

बुधवार, एप्रिल १८, २०१२ Edit This 0 Comments »


मी म्हणायचो नेहमी तिला ,
चौपाटीला जाऊ , भेळपुरी खाऊ,
तर ती म्हणायची मुळीच 
आवडत नाही रे मला ,
अरे हातात हात घालून फिरण्याची
कळलीच नाही मजा तिला ,
खरेचं आहे न राव . . .
प्रेम कसे करायचे याचा अर्थच नाही कळाला तिला . . .

मी म्हणायचो नेहमी तिला ,
रोमांटीक मूवी लागलाय सिनेमाक्स ला  ,
तर ती म्हणायची नको रे ,
कंटाळा येतो रे खूप मला 
अरे त्या अंधाराची संधी साधून 
मूवी पाहण्याचा आनंदच निराला,
खरेचं आहे न राव . . .
प्रेम कसे करायचे याचा अर्थच नाही कळाला तिला . . .

मी म्हणायचो नेहमी तिला ,
कुलकॅम्प मध्ये जाऊ आईसक्रीम  खाऊ, 
तर शी बाई करून नाक मुरडण्याचा 
लई चटका तिला लागलेला,
अरे नाकावर लागलेली आईसक्रीम
काढण्याचा बहाणाच तो निराला ,
खरेचं आहे न राव . . .
प्रेम कसे करायचे याचा अर्थच नाही कळाला तिला . . .

मी म्हणायचो नेहमी तिला ,
समुद्रकिनारी जाऊन शंख वेचू ,
किनार्यावर बसून एकमेकांत रमून जाऊ,
तर ती टर उडवत म्हणाली,
काय पण कसे रे सुचते तुला ,
अरे खांद्यावर डोके ठेऊन सूर्यास्त पाहण्याचा 
किती  रम्य तो सोहळा
खरेचं आहे न राव . . .
प्रेम कसे करायचे याचा अर्थच नाही कळाला तिला . . .

एकदा तीच येऊन म्हणली मला ,
नाही जमणार रे आपले  पुढे काही?
परवानगी सुद्धा मिळणार नाही लग्नाला
तेव्हा मीच मग म्हणालो ,
लग्नासाठी फक्त दोन मनें जुळली पाहिजेत ग,
एवढा साधा अर्थ कळत नाही का ग तुला ?

पण खरेचं आहे न राव . . .
प्रेम कसे करायचे याचा नेमका अर्थच नाही कळाला तिला . . .

मिलिंद आग्रे . . .
http://www.facebook.com/milindagre