विणलेला गोफ दुहेरी..

सोमवार, मे २८, २०१८ Edit This 0 Comments »


विणलेला मी गोफ दुहेरी
खुलविण्या अपुल्या नात्याचा
हसरा चेहरा झाला जायबंदी
जेव्हा डाव मोडला खेळाचा ..

मृगजळ सारे विरून गेले
पाऊस होऊनि वाहुनी गेले
अर्थ न राहिला आता जराही 
हातावरच्या अस्पष्ट रेषांचा ..

राहिलो मी किनारी एकटा
पाहत त्या फेसाळलेल्या लाटा
थांग आता लागणार तरी कसा
अवसेच्या रातीला चंद्राचा ..

सावली झाली गडप कोठे
स्पर्श हे झाले मुके असे 
उलटे पडले फासे सारे 
रंग उडाला हा बहराचा ..

मिलिंद (नंदू) आग्रे . . .

https://www.facebook.com/milind.agre.58 

Mb. No :- 8108821950

0 टिप्पणी(ण्या):