माझी आठवण . . .

बुधवार, ऑगस्ट ३१, २०११ Edit This 0 Comments »

पाऊस नभी दाटलाय

तू खिडकी काय बंद करतेय

माझी आठवण पण बघ न

कशी कवडसा शोधतेय


 मिलिंद (नंदू) आग्रे . . . 

https://www.facebook.com/milind.agre.58 

Mb. No :- 8108821950

हे मन . . ..

बुधवार, ऑगस्ट ३१, २०११ Edit This 0 Comments »

सोसाट्याच्या या वादळात

हे मन खरेच हरवलेले

रस्ता चुकलं ग ते, अन

नको तिथं जाऊन  फसले 

मिलिंद आग्रे . . .

पाऊस ....

शनिवार, ऑगस्ट २७, २०११ Edit This 0 Comments »
 
या मुसळधार पावसाने ,
आज थैमान घातलेय ,
तिच्या आठवणी मध्ये ,
चिंब भिजवून सोडलेय . . .
मिलिंद . . .

निसर्ग ...

शनिवार, ऑगस्ट २७, २०११ Edit This 0 Comments »

निसर्गाचे सानिध्य हे ,
किती वेड लावते या मना ,
ताल छेडून सुरांची ते,
सजवते सरगम या मना ,
मिलिंद ...

काय डौलाने झुलतेय . . .

शनिवार, ऑगस्ट ०६, २०११ Edit This 0 Comments »


काय   डौलाने  झुलतेय  ग

ती नथ तुझ्या नाकात

सौंदर्य  तर  खुलतेय  ग

पण अडथळा का प्रेमात

मिलिंद आग्रे

मित्र बनवा फेसबुक वर . . .

गुरुवार, ऑगस्ट ०४, २०११ Edit This 0 Comments »
 


नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो 
मला जॉईन करा फेसबुक वर 
या id ne सर्च करा
 
धन्यवाद 
मिलिंद आग्रे 

मन ठेवायचं गहाण ...

बुधवार, ऑगस्ट ०३, २०११ Edit This 0 Comments »

असा कसा खेळ झाला नशिबाचा ,

आज आसवे कोसळतायत बेभान ,

आहे का कोणी गिर्हाईक मित्रांनो ,

या पाखराच मन ठेवायचं गहाण  ...

मिलिंद आग्रे ...

आठवतंय का तुला ?

सोमवार, जुलै २५, २०११ Edit This 0 Comments »


आठवतंय का तुला ?

त्या पहिल्याच भेटीच्या रिमझिम पावसात 

तुझे हात माझ्या हातात गुरफटले होते ...

आपल्या त्या निर्णयावर त्या पावसानेही 

जणू फुलांचे टपोरे थेंब सोडले होते ...


 मिलिंद (नंदू) आग्रे . . . 

https://www.facebook.com/milind.agre.58 

Mb. No :- 8108821950

शहारा ...

बुधवार, जुलै २०, २०११ Edit This 0 Comments »


शहारा आणतो ग तुझा स्पर्श ,
शिरतेस तू जेव्हा मिठीत माझ्या ,
आवर घाल ग तुझ्या स्पर्शाला ,
कळतंय काय आहे मनात तुझ्या . . .
मिलिंद आग्रे . . . 

नखरेल हि रात्र...

गुरुवार, जुलै १४, २०११ Edit This 0 Comments »




नखरेल हि रात्र माझी सोने ,
तुझ्याच मिठीत विरून जावी,
पहाटे पुन्हा तुझा चेहरा पाहून,
माझी अलगद झोपमोड व्हावी,
मिलिंद आग्रे ...

सांज वेडी ...

गुरुवार, जुलै १४, २०११ Edit This 0 Comments »

सांज वेडी खुळी सरणार रे ,
मावळत जाणार हा प्रकाश ,
खुलणार नभी त्या चंद्रमा ,
फक्त काही क्षणांचा अवकाश ..
मिलिंद आग्रे ...

असा दिवस कधी येईल ...

बुधवार, जुलै १३, २०११ Edit This 0 Comments »

घराच्या बाल्कनीतून उभी राहून 
सोने तू चंद्राकडे पाहत राहील ...

मग दब्या पावलाने मी मागून येऊन
तुझ्या कमरेला अलगद विळखा घालीन ...

तू हि हळूच मग मागे वळून
माझ्या नजरेला नजरकैद देशील ...

त्या बोलक्या अशा धुंद नजरेने
तू मला अलगद मिठीत घेशील ..

प्रसंगावधान राखून मग चंद्रही
लाजेने त्या ढगाआड लपून जाईल ...

सांग न सोने असा दिवस कधी येईल ...
कधी येईल.. कधी येईल ..

सोने साथ देशील का कायमचा.....

बुधवार, जुलै ०६, २०११ Edit This 0 Comments »


आकाशी सप्तरंगी ईंद्रधनुष्य,
तुझ्या प्रत्येक भेटित नवा हर्ष,
तुझा तो घायाळ करणारा कटाक्ष,
तुझा तो चोरुन मिळणारा स्पर्श...

तुझ्या गालावरची ती खळी,
जणु ते मन माझे जाळी,
नाक तुझे ते चाफेकळी,
न उमललेली तु नाजुक कळी...

गुलाबाच्या पाकळ्यासारखे ओठ लाल,
हरणीसारखी नखरेल चाल,
रुपाला तुझ्या सोने तुच आवर घाल,
मादक नजर तुझी करी जिवाला घायाल...

तुझा तो तोरा, डौलदार थाट,
सुडौल बांधा, रेशमी असा हात,
शरिराचा जणु वळणदार घाट,
न उलगडणारि तु एक पायवाट...

तुझे ते सुंदर पाणीदार डोळे,
पावसात चिंब शरिर भिजलेले,
उगाच पाय घसरेल कि काय पण,
मी स्वतःच स्वतःला सावरले...

तुझ्या पायातले ते पैंजण,
कानात झुमके, हातात कांकण,
जणु मथुरेच्या बाजाराला,
निघालेली सुंदर तु गवळण...

सोने फक्त तूच मला म्हणाली,
म्हणुन मी ही कविता रचली,
हा कवितेचा छोटा प्रयत्न पाहुन,
खुलेल का गं तुझ्या ओठांची लाली...

माझा हा पहिलाच प्रयत्न कवितेचा,
मान राखुन आपल्या या प्रेमाचा,
खरचं खुप प्रेम केलय तुझ्यावर मी,
सांग सोने साथ देशील का कायमचा...

सांग सोने साथ देशील का कायमचा...

सांग सोने साथ देशील का कायमचा...

मिलिंद आग्रे

माझे हृदय ...

मंगळवार, जून २८, २०११ Edit This 0 Comments »

माझे हृदय आता माझे नाही ,

ते आता तुझे झाले आहे ,

माझ्यासाठी श्वास घेणे ,

त्याने कधीच सोडले आहे . . .

मिलिंद आग्रे

गोड गुलाबी ओठ ..

गुरुवार, जून १६, २०११ Edit This 0 Comments »



तिच्या गोड गुलाबी ओठांचा मधुर रस  ,

 माझ्या शरीरात असा काही भिनलाय ,

काय सांगायचं तुम्हाला सवंगड्याहो ,

या पट्ठ्याने आता चहा प्यायचाच सोडलाय ...

मिलिंद आग्रे

सखे तू . . .

सोमवार, जून १३, २०११ Edit This 0 Comments »


सखे तू पावसात भिजत आहे ,

म्हणून पावसाला पण राहवले नाही ,

तुला चिंब चिंब भिजवायचे म्हणून ,

त्याने हि बरसायचे थांबवले नाही . .

मिलिद आग्रे ...

तिचे रूप . . .

सोमवार, जून १३, २०११ Edit This 0 Comments »

तिच्या हातातल्या बांगड्याची छनछन ,
 
माझ्या कानात घर करून गेली  ,
 
तिचे चिंब भिजलेले रूप पाहून ,
 
स्वर्गाची अप्सरा हि लाजून गेली ...
मिलिंद आग्रे ...

वाट

रविवार, जून १२, २०११ Edit This 0 Comments »
सखे तू गेलीस त्या वाटेला_
अजून डोळे लावून बसलोय_
वाट विरत चाललीय पण_
अजून आस लावून बसलोय_

मिलिंद आग्रे




त्या पहिल्या रिमझिम ...

सोमवार, मे २३, २०११ Edit This 0 Comments »


त्या पहिल्या रिमझिम अशा धुंद पावसात ,
मला तुझ्या मिठीत चिंब चिंब भिजायचंय ,
आणि भिजता भिजता तुझ्या नकळत मला ,
तुझ्या ओठांवरचा थेंब माझ्या ओठांनी टीपायचंय . . .

शक्य आहे का ...

सोमवार, मे १६, २०११ Edit This 0 Comments »

शक्य आहे का तुला कायमचे विसरणे ,
शक्य आहे का तुझ्या आठवणींतून सावरणे , 
तू तर एक अनमोल भेट आहे माझ्या प्रेमाची , 
शक्य आहे का त्या भेटीची किंमत चुकवणे . . .
                                                        . . . . . . . . . मिलिंद आग्रे 

सुंदर ती संध्याकाळ ...

सोमवार, मे १६, २०११ Edit This 0 Comments »

नुकताच कुठे सूर्य अस्ताला गेला असेल ,
आकाशी काळे ढग जमा झालेले असेल ,
मस्त असा थंड गार वारा वाहत असेल ,
अशा या रम्य संध्याकाळी ,
हातात चहा आणि आठवणीत फक्त तीच असेल 
आता तुम्हीच थोडा विचार करा ,
किती सुंदर ती संध्याकाळ असेल . . .
. .  . . . . ...मिलिंद आग्रे

उन्हाळ्यातच पावसाची सर ..

शुक्रवार, मे ०६, २०११ Edit This 0 Comments »
 
का जाणो आत्ताच नकळत तुझी आठवण आली
जशी उन्हाळ्यातच अवकाळी पावसाची सर आली
मी अलगद स्पर्श केला त्या सरींच्या टपोर्या थेंबांना
तर त्या प्रत्येक थेंबात मला तुझी छबी नजर आली ...

प्रेम ...

शुक्रवार, मे ०६, २०११ Edit This 0 Comments »
 
खूप सहजतेने कोणावर हे मन जडत ,
पण ते तिला सांगण खूप जड जात ,
घेवून जाते प्रेम अशा एका वाटेवर ,
जेथून माग फिरन खूपच अवघड असत  . . .

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ...

सोमवार, एप्रिल ०४, २०११ Edit This 0 Comments »

सर्वांना गुढीपाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ....
हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना आनंददायी
आणि सुख - समृद्धीचे जावो हीच सदिच्छा ..

सौंदर्य पाहून ...

शुक्रवार, एप्रिल ०१, २०११ Edit This 0 Comments »
 
 
सौंदर्य पाहून कधीच प्रेम होत नाही ,
कारण ते आज आहे उद्या नसेल ,
त्यासाठी एकमेकांवर विश्वास हवा ,
कारण तोच आयुष्यभर सोबतीला असेल ...

आयुष्याचा ...

मंगळवार, मार्च २९, २०११ Edit This 0 Comments »

आयुष्याचा जास्त विचार करू नये ..
प्रेमात परीणामांची पर्वा करू नये ..
असे एका साथीदाराला अंधारात ठेवून ..
दुसरयाशी आपले सुत जुळवू नये ...

वारयानेच माझी मस्करी ...

शुक्रवार, मार्च २५, २०११ Edit This 0 Comments »


तू नाही आलीस ,तुझी आठवण येऊन गेली ..
तुला भेटण्याची आता इच्छाच नाही राहिली ..
तरी पण भास झाला मनाला ,वाटले कि तू आली ..
पण दार उघडून पाहतो तर काय ,
त्या खट्याळ वारयानेच माझी मस्करी केली ......

खूप आस होती ग ...

बुधवार, मार्च २३, २०११ Edit This 0 Comments »


खूप आस होती ग तुला एकदा तरी भेटण्याची
माझ्या मनातल्या भावना तुला सांगण्याची
निदान मी मेल्यावर तरी मला गळ्याशी लाऊन रड
खरच खूप इच्छा होती तुला गळ्याशी कवटाळण्याची .

धुळवड

गुरुवार, मार्च १७, २०११ Edit This 0 Comments »

मथुरेच्या गवळणीच्या घोळक्यात ...
मला साजेशी एक गवळण शोधतोय ...
उधळेन माझ्या सावल्या रंगावर गुलाल ..
अशी सुंदर एक राधा शोधतोय ...
* धुळवड च्या हार्दिक शुभेच्छा *

देवाने जेव्हा ..

मंगळवार, मार्च १५, २०११ Edit This 0 Comments »



देवाने जेव्हा प्रेम निर्माण केले असेल

त्याने ते स्वतःवर देखील अनुभवले असेल

प्रेमात काय-काय भोगावे लागते हे कळल्यावर

तो देखील नक्कीच मनापासून रडला असेल


मिलिंद (नंदू) आग्रे . . .



https://www.facebook.com/milind.agre.58 

Mb. No :- 8108821950

तुझ्याविना जगू कसे ...

शनिवार, मार्च १२, २०११ Edit This 0 Comments »


रुसण्याच्या आधी मनवू कसे ते शिकव
रडण्याच्या आधी हसवू कसे ते शिकव
जर जायचेच असेल माझ्यापासून दूर
तर तुझ्याविना जगू कसे ते शिकव ....
 

अपेक्षा ...

शुक्रवार, मार्च ११, २०११ Edit This 0 Comments »
 
जीवनाकडून कुठल्याच अपेक्षा ठेवू नका,
कारण अपेक्षा असूनही,
जर का ती गोष्ट आपल्याला मिळाली नाही.
तर आपले मन दुखावले जाते,
आणि जर,अपेक्षा न ठेवता काही मिळाले तर,
त्यातून मिळणारा आनंद हा अफलातून असतो

गालावरची बट ...

गुरुवार, मार्च १०, २०११ Edit This 0 Comments »
 
 
तुझ्या गालावर आलेली केसांची बट ,
मला खूप जळवून सोडते ,
वेटोळे घेत घेत का होईना ,
ती तुझ्या गुलाबी गोबर्र्या गालाला ,
क्षणासाठी स्पर्श करून जाते ...

तुझी आठवण ...

गुरुवार, मार्च १०, २०११ Edit This 0 Comments »


तुझी आठवण काढणे मला खूप भावत,
फक्त कधी भेटत नाहीस ,हेच मनी खुपत,
उगाच डोळ्यांच्या नजरेआड जाशील,
म्हणून वेड मन हे झोपायलाही घाबरत...

तेवढा मीच का.....

बुधवार, फेब्रुवारी २३, २०११ Edit This 0 Comments »

सारी पाखरे आकाशात उडत असताना ,
वेडा बदक का पाण्यात तरंगतो ,
सारे जग झोपले असताना ,
तेवढा मीच का रात्र-रात्र तिच्या ,
आठवणींमध्ये झुरतो .....

हे देवा ...

सोमवार, फेब्रुवारी २१, २०११ Edit This 0 Comments »


माझ्या मनातले गुपित तिला सांगू शकत नाही ,
अन न सांगता सुद्धा राहू शकत नाही ,
हे देवा असे काहीतरी कर कि ,
ती स्वतः येऊन म्हणेल मला ,
मीच तुझ्याशिवाय राहू शकत नाही  ...

आसवांचे महत्व ...

सोमवार, फेब्रुवारी २१, २०११ Edit This 0 Comments »

आसवांचा प्रत्येक थेंब हा मौल्यवान असतो ,
पण याचे महत्व हे ,
स्वतःच्या डोळ्यांत आल्याशिवाय कळत नाही ...

काल रात्री डोळ्यांतून ...

सोमवार, फेब्रुवारी २१, २०११ Edit This 0 Comments »


काल रात्री डोळ्यांतून एक थेंब बाहेर आला ..
मी त्याला विचारले तू बाहेर का आलास ते ..
तो मला हसतच म्हणाला कि ..
तुझ्या डोळ्यांत कोणी इतके सामावले आहे कि ..
मला वाटून सुद्धा मी जागा नाही बनवू शकलो.

एकदा तरी प्रेम ....

सोमवार, फेब्रुवारी २१, २०११ Edit This 0 Comments »

आयुष्य खूप सुंदर आहे ,
पण त्याला प्रेमरूपी रंगाची गरज आहे ,
आयुष्याला प्रेमाने रंगवून पाहावे ,
खरंच ... या जीवनात प्रत्येकाने ,
एकदा तरी प्रेम करून पाहावे ....

तिच्या विचारात ..

सोमवार, फेब्रुवारी २१, २०११ Edit This 0 Comments »

गरम चहाच्या निघणार्या त्या धुरात ..
नेहमी तिचाच चेहरा दिसतो ..
आणि मग तिच्या विचारात रमून गेल्यावर ..
नेहमी माझा चहा थंड होऊन जातो ..

चंद्र सुद्धा ...

शनिवार, फेब्रुवारी १९, २०११ Edit This 0 Comments »
चंद्र सुद्धा तुझ्यावर जळत असेल ,
जेव्हा तो तुला लाजताना पाहत असेल ,
खरच तुझे रूप न्याहळता न्याहळता ,
तोही मावळायचे विसरत असेल ...

तिच्या विचारांनी ...

शनिवार, फेब्रुवारी १९, २०११ Edit This 0 Comments »
तिच्या विचारांनी सवड मिळत नाही ,
एक क्षण सुद्धा वेळ मिळत नाही ,
तसे तर सगळे मिळाले आहे मला ,
फक्त बघायला तिचा मुखडा मिळत नाही ...

दु:ख ...

शनिवार, फेब्रुवारी १९, २०११ Edit This 0 Comments »

इथे प्रत्येकाच्या मनात दु:ख लपलेले असते ...
फरक असतो तो फक्त व्यक्त करण्यात ..
काहीजण ते डोळ्यांत लपवतात ..
तर .. काहीजण ते आपल्या हास्यात ..

खर्या प्रेमाची जाणीव...

शनिवार, फेब्रुवारी १९, २०११ Edit This 0 Comments »
पाण्याची खरी चव ,
तहान लागल्याशिवाय कळत नाही ..
आणि ..
खर्या प्रेमाची जाणीव हि ,
एकटे असल्याशिवाय कळत नाही ..

खुबी नाही माझ्यात..

शनिवार, फेब्रुवारी १९, २०११ Edit This 0 Comments »



खुभी नाही माझ्यात इतकी कि ,

कुणाच्या हृदयात ठाण मांडून जाईल ,

पण विसरणे सुद्धा अशक्य होईल ,

असे अविस्मरणीय क्षण जे देऊन जाईल ...

मिलिंद (नंदू) आग्रे . . . 
https://www.facebook.com/milind.agre.58 
Mb. No :- 8108821950

प्रेम ...

शनिवार, फेब्रुवारी १९, २०११ Edit This 0 Comments »

तुझा तो सुंदर चेहरा पहिला कि ,
मनाला खूप हायसे वाटत ,
ओठ दातात दाबून लाजलीस कि ,
तुझ्यावरच प्रेम अजून उफाळून येत ..
.

सवय ..

शनिवार, फेब्रुवारी १९, २०११ Edit This 0 Comments »
सवय आहे मला तिची आठवण काढण्याची ,
या डोळ्यांना फक्त तिचे रूप पाहण्याची ,
खरच खूप प्रेम आहे माझे तिच्यावर ,
पण तिला मात्र सवय आहे मला सतावण्याची  ...

आकाशीचा चंद्र ...

शुक्रवार, फेब्रुवारी १८, २०११ Edit This 0 Comments »

अंगणात असताना आकाशी चंद्र दिसला ,
त्याला मन भरून पाहतो न पाहतो तोच ,
तो ढगांआड जाऊन लपला ,
वाट पाहत बसलो ते ढग सरकण्याची ,
पण तोपर्यंत ....
तो चंद्र कुणा दुसर्याचा होऊन बसला ...

आठवणीच्या हिंदोल्यांचा

शुक्रवार, फेब्रुवारी १८, २०११ Edit This 0 Comments »

आठवणीच्या हिंदोल्यांचा थेंब बनून येईल ,
हृदयात तुझ्या घर करून जाईल ,
फक्त मनापासून आठवण काढ कधी ,
अमावस्या जरी असली ना तरी ,
पौर्णिमेचा लखलखता चंद्र बनून येईल ...

एक पुस्तक ,

शुक्रवार, फेब्रुवारी १८, २०११ Edit This 0 Comments »

देवाने मला एक पुस्तक बनवले असते ..
ते वाचण्यासाठी फक्त तिला बनवले असते ..
ती ते वाचता वाचता झोपी गेली असती ..
त्या बहाण्याने का होईना तिने काही क्षणासाठी ..
मला गळ्याशी कवटाळले असते ...

जीवाचे जिवलग ..

शुक्रवार, फेब्रुवारी १८, २०११ Edit This 0 Comments »

देव पण न जाणो कोठून कसे नाते जुळवतो ,
अनोळखी माणसाला हृदयात स्थान देऊन जातो ,
ज्यांना आपण कधी ओळखत हि नसतो ,
त्यांना पार जीवाचे जिवलग करून ठेवतो ..

कोणा एकासाठी नक्कीच खास ....

शुक्रवार, फेब्रुवारी १८, २०११ Edit This 0 Comments »
एक स्वतंत्र असे मन तर सर्वांकडे असते ..
तरी त्या मनाचा कोणावरही विश्वास नसतो ..
माणूस कितीही कमनशिबी जरी असला ..
तरी तो कोणा एकासाठी नक्कीच खास असतो ..

मनात फक्त काहीच जन ...

शुक्रवार, फेब्रुवारी १८, २०११ Edit This 0 Comments »
नाती तर सर्वच मौल्यवान असतात ..
पण याला खरे रूप तर काहीच जन देतात ..
एक छोटे मन तर सर्वांनाच असते ..
पण या मनात फक्त काहीच जन घर करतात ..

कदाचित हे जीवन..???

शुक्रवार, फेब्रुवारी १८, २०११ Edit This 0 Comments »
कदाचित हे जीवन इतके सुंदर असते ,
कि आपल्याला हवे ते मिळाले असते ,
म्हणायला तर सर्व आपलेच आहेत ,
पण कुणी असे हवे होते कि ..
ज्याला आपल्या मनातले उमगले असते ...

विचार केला असा कि ,

शुक्रवार, फेब्रुवारी १८, २०११ Edit This 0 Comments »
मनात विचार केला असा कि ,
तिला कायमचे विसरायचे ...
पाहून सुद्धा न पाहिल्यासारखे करायचे ..
पण काय करू मी तरी ..?
जेव्हा जेव्हा आला तिचा चेहरा समोर ..
वाटते आता थोडे बघून घ्यावे ,
पण नंतर मात्र नक्की विसरायचे ..

प्रेम म्हणजे काय हे..!

शुक्रवार, फेब्रुवारी १८, २०११ Edit This 0 Comments »

प्रेम म्हणजे काय हे ?
कधी कुणाला कळलेच नाही ,
छोटे से कोड ते ,
पण कधी कुणाला उलगडलच नाही...

थेंब

शुक्रवार, फेब्रुवारी १८, २०११ Edit This 0 Comments »
काल रात्री डोळ्यांतून एक थेंब बाहेर आला ,
मी त्याला विचारले तू बाहेर का आलास ते ?
तो मला हसतच म्हणाला कि ..
तुझ्या डोळ्यांत कोणी इतके सामावले आहे कि ,
मला वाटून सुद्धा मी जागा नाही बनवू शकलो ......

स्वप्न रंगवू तरी कसे .. ?

शुक्रवार, फेब्रुवारी १८, २०११ Edit This 0 Comments »
माझ्या डोळ्यात जे लिहिले आहे ,
ते खोडू तरी कसे ,
कोणी सांगेल का ?
तिला विसरू तरी कसे ?
जागता जागता स्वप्न पाहतो जिचे  ,
तिच्याशिवाय दुसरी कुणाचे
स्वप्न रंगवू तरी कसे  ?????

करायचे असेल प्रेम तर ,

शुक्रवार, फेब्रुवारी १८, २०११ Edit This 0 Comments »

करायचे असेल प्रेम तर
कोणा एकीवरच असे करा कि  ,
परत प्रेम करण्याची गरज राहणार नाही ,
ती पाहेन हळूच वळून एकदा कि ,
या जीवनाकडे परत
कुठलीच अपेक्षा राहणार नाही ..

मलाही वाटत होतो ..

शुक्रवार, फेब्रुवारी १८, २०११ Edit This 0 Comments »
मलाही वाटत होतो ,
तिच्या प्रेमात पडाव ,
तिच्या हृदयाच्या कोपर्यात ,
माझे बस्तान मांडाव ...

एक उनाड पाखरू ...

शुक्रवार, फेब्रुवारी १८, २०११ Edit This 0 Comments »

मन हे शेवटी मन असत  ...
आकाशात उडणार एक उनाड पाखरू असते ...
आज हिच्यावर तर उद्या तिच्यावर जाऊन बसत ..
पण नेहमी असच का घडत असत ...
जिच्यावर आपले मन बसत ...
तीच मन आधीच कुणावर तरी बसलेले असत ...
ठाण मांडून ..