असे हे सरकार आपुले . . .
रविवार, सप्टेंबर २५, २०११ Edit This 0 Comments »आज जिथे तिथे होतायत बॉम्बस्फोट
यांना आवर तरी कोण घालणार
मात्र वर तोंड करून नक्की म्हणणार
बॉम्बस्फोट तर होताच राहणार
. . . .असे हे सरकार आपुले
आजही अंधारलेली गावे आहेत इथे
ज्यांनी सूर्याशिवाय उजेड पहिला नाही
पण या पांढरपेशीच्या पार्ट्या सभांना
रोषणाई कधी चुकली नाही
. . . .असे हे सरकार आपुले
करोडोंचा खर्च होतो त्या अतिरेक्यावर
का तर त्याला सुरक्षित ठेवावे
इथे एक रोज निष्पापाचा बळी जातोय
त्यांच्याकडे कोणी बरे ते पाहावे
. . . .असे हे सरकार आपुले
आजही इथला गरीब अर्धपोटी झोपतोय
वंचीत आहे तो पोटभर जेवणासाठी अजून
पण त्या पापाच्या धनी कसाबला मात्र
पोटभर बिर्याणी खायला आवर्जून
. . . . असे हे सरकार आपुले
या देशात बाहेरून येणाऱ्या अतिरेक्यांना
बिनधास्त असा प्रवेश मिळतो
मात्र याच मातीतल्या माणसांना
तो आधाराची ओळख नक्की मागतो
. . . .असे हे सरकार आपुले
मिलिंद आग्रे . . .
http://www.facebook.com/milindagre
सकाळची वेळ होती ..
बुधवार, सप्टेंबर २१, २०११ Edit This 0 Comments » सकाळची वेळ होती
ऑफिस ला निघालो होतो
बस मध्ये बसून
बाहेर डोकावत होतो ...
अलगद गारवा
सुटला होता हवेत
मस्त सुंदर वेळ ती
जणू माझ्या कवेत ...
तितक्यात एका स्टोप वर
एक मुलगी चढली
काय सांगू तुम्हाला
तिची ती नजर पहिली ...
साधा पेहराव तिचा
गळ्यात लाल ओढणी
सर्वांची नजर मग
तिच्यावरच खिळली ...
आली ती गर्दीत
स्वताला सावरत
डोळ्यांवरची ती बट
अलवार बाजूला सारत ...
ती गहिरी नजर शेवटी
माझ्यावर पडली
अन चक्क ती मुलगी
माझ्या जवळ आली ...
जवळ येऊन माझ्या
काय म्हणावे तिने मला
म्हणाली लेडीज सीत आहे
उठ लवकर, बसू दे मला ...
काय राव काय सांगू कसला
हिरमोड झाला तिथे माझा
पण मी ऐकून घेतोय काय
मी हि अस्सल पुजारी प्रेमाचा ..
म्हणालो तिला, बस ग तू
या जागेचा काही फायदा नाही
माझ्याशी मैत्री करून तर बघ
मनात भरल्याशिवाय राहणार नाही
हे चार शब्द ऐकताच
ती अशी काही हसली
गुलाबांच्या त्या पाकळ्यांवर
काय मस्त लाली खुलली...
ऑफिस ला निघालो होतो
बस मध्ये बसून
बाहेर डोकावत होतो ...
अलगद गारवा
सुटला होता हवेत
मस्त सुंदर वेळ ती
जणू माझ्या कवेत ...
तितक्यात एका स्टोप वर
एक मुलगी चढली
काय सांगू तुम्हाला
तिची ती नजर पहिली ...
साधा पेहराव तिचा
गळ्यात लाल ओढणी
सर्वांची नजर मग
तिच्यावरच खिळली ...
आली ती गर्दीत
स्वताला सावरत
डोळ्यांवरची ती बट
अलवार बाजूला सारत ...
ती गहिरी नजर शेवटी
माझ्यावर पडली
अन चक्क ती मुलगी
माझ्या जवळ आली ...
जवळ येऊन माझ्या
काय म्हणावे तिने मला
म्हणाली लेडीज सीत आहे
उठ लवकर, बसू दे मला ...
काय राव काय सांगू कसला
हिरमोड झाला तिथे माझा
पण मी ऐकून घेतोय काय
मी हि अस्सल पुजारी प्रेमाचा ..
म्हणालो तिला, बस ग तू
या जागेचा काही फायदा नाही
माझ्याशी मैत्री करून तर बघ
मनात भरल्याशिवाय राहणार नाही
हे चार शब्द ऐकताच
ती अशी काही हसली
गुलाबांच्या त्या पाकळ्यांवर
काय मस्त लाली खुलली...
काय मस्त लाली खुलली
मिलिंद आग्रे . . .
मिलिंद आग्रे . . .
http://www.facebook.com/milindagre
माझे अस्तित्व आहेस ग तू . . ..
शनिवार, सप्टेंबर १७, २०११ Edit This 0 Comments »ती :-
तू आता पहिल्यासारखा का राहिला नाही ?
तो :-
कसा असणार ? आता तुझी साथ जी सोबतीला नाही ...
ती :-
आता परत कोणाच्या नजरेत गुंतशील का ?
तो :-
आता गुंतायला तशी पाणीदार नजर सापडणार नाही...
ती :-
सोन्या इतके कशाला रे प्रेम केलेस रे माझ्यावर ?
तो :-
जीव तू माझा , अन स्वताचा जीव कोणाला प्रिय नाही ...
ती :-
सख्या तूच सांग मी काय बेवफा आहे काय ?
तो :-
सोने बेवफा आपले नशीब आहे ग तू बिलकुल नाही ..
ती :-
मग असे कर न , विसरून जा ना मला तू कायमचा ...
तो :-
(जरा हसतच म्हणाला )
माझे अस्तित्व आहेस ग तू , तुला विसरायला तू एक स्वप्न नाही ...
मिलिंद आग्रे . . .
http://www.facebook.com/milindagre
हे मन . . ..
बुधवार, ऑगस्ट ३१, २०११ Edit This 0 Comments »सोसाट्याच्या या वादळात
हे मन खरेच हरवलेले
रस्ता चुकलं ग ते, अन
नको तिथं जाऊन फसले
मिलिंद आग्रे . . .
हे मन खरेच हरवलेले
रस्ता चुकलं ग ते, अन
नको तिथं जाऊन फसले
मिलिंद आग्रे . . .
मित्र बनवा फेसबुक वर . . .
गुरुवार, ऑगस्ट ०४, २०११ Edit This 0 Comments »नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो
मला जॉईन करा फेसबुक वर
या id ne सर्च करा
धन्यवाद
मिलिंद आग्रे
असा दिवस कधी येईल ...
बुधवार, जुलै १३, २०११ Edit This 0 Comments »घराच्या बाल्कनीतून उभी राहून
सोने तू चंद्राकडे पाहत राहील ...
मग दब्या पावलाने मी मागून येऊन
तुझ्या कमरेला अलगद विळखा घालीन ...
तू हि हळूच मग मागे वळून
माझ्या नजरेला नजरकैद देशील ...
त्या बोलक्या अशा धुंद नजरेने
तू मला अलगद मिठीत घेशील ..
प्रसंगावधान राखून मग चंद्रही
लाजेने त्या ढगाआड लपून जाईल ...
सांग न सोने असा दिवस कधी येईल ...
कधी येईल.. कधी येईल ..
सोने साथ देशील का कायमचा.....
बुधवार, जुलै ०६, २०११ Edit This 0 Comments »आकाशी सप्तरंगी ईंद्रधनुष्य,
तुझ्या प्रत्येक भेटित नवा हर्ष,
तुझा तो घायाळ करणारा कटाक्ष,
तुझा तो चोरुन मिळणारा स्पर्श...
तुझ्या गालावरची ती खळी,
जणु ते मन माझे जाळी,
नाक तुझे ते चाफेकळी,
न उमललेली तु नाजुक कळी...
गुलाबाच्या पाकळ्यासारखे ओठ लाल,
हरणीसारखी नखरेल चाल,
रुपाला तुझ्या सोने तुच आवर घाल,
मादक नजर तुझी करी जिवाला घायाल...
तुझा तो तोरा, डौलदार थाट,
सुडौल बांधा, रेशमी असा हात,
शरिराचा जणु वळणदार घाट,
न उलगडणारि तु एक पायवाट...
तुझे ते सुंदर पाणीदार डोळे,
पावसात चिंब शरिर भिजलेले,
उगाच पाय घसरेल कि काय पण,
मी स्वतःच स्वतःला सावरले...
तुझ्या पायातले ते पैंजण,
कानात झुमके, हातात कांकण,
जणु मथुरेच्या बाजाराला,
निघालेली सुंदर तु गवळण...
सोने फक्त तूच मला म्हणाली,
म्हणुन मी ही कविता रचली,
हा कवितेचा छोटा प्रयत्न पाहुन,
खुलेल का गं तुझ्या ओठांची लाली...
माझा हा पहिलाच प्रयत्न कवितेचा,
मान राखुन आपल्या या प्रेमाचा,
खरचं खुप प्रेम केलय तुझ्यावर मी,
सांग सोने साथ देशील का कायमचा...
सांग सोने साथ देशील का कायमचा...
सांग सोने साथ देशील का कायमचा...
मिलिंद आग्रे
एकदा तरी प्रेम ....
सोमवार, फेब्रुवारी २१, २०११ Edit This 0 Comments »आयुष्य खूप सुंदर आहे ,
पण त्याला प्रेमरूपी रंगाची गरज आहे ,
आयुष्याला प्रेमाने रंगवून पाहावे ,
खरंच ... या जीवनात प्रत्येकाने ,
एकदा तरी प्रेम करून पाहावे ....
खरंच ... या जीवनात प्रत्येकाने ,
एकदा तरी प्रेम करून पाहावे ....
तिच्या विचारांनी ...
शनिवार, फेब्रुवारी १९, २०११ Edit This 0 Comments »तिच्या विचारांनी सवड मिळत नाही ,
एक क्षण सुद्धा वेळ मिळत नाही ,
तसे तर सगळे मिळाले आहे मला ,
फक्त बघायला तिचा मुखडा मिळत नाही ...
एक क्षण सुद्धा वेळ मिळत नाही ,
तसे तर सगळे मिळाले आहे मला ,
फक्त बघायला तिचा मुखडा मिळत नाही ...
दु:ख ...
शनिवार, फेब्रुवारी १९, २०११ Edit This 0 Comments »इथे प्रत्येकाच्या मनात दु:ख लपलेले असते ...
फरक असतो तो फक्त व्यक्त करण्यात ..
काहीजण ते डोळ्यांत लपवतात ..
तर .. काहीजण ते आपल्या हास्यात ..
फरक असतो तो फक्त व्यक्त करण्यात ..
काहीजण ते डोळ्यांत लपवतात ..
तर .. काहीजण ते आपल्या हास्यात ..
खर्या प्रेमाची जाणीव...
शनिवार, फेब्रुवारी १९, २०११ Edit This 0 Comments »पाण्याची खरी चव ,
तहान लागल्याशिवाय कळत नाही ..
आणि ..
खर्या प्रेमाची जाणीव हि ,
एकटे असल्याशिवाय कळत नाही ..
तहान लागल्याशिवाय कळत नाही ..
आणि ..
खर्या प्रेमाची जाणीव हि ,
एकटे असल्याशिवाय कळत नाही ..










































